पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शिक्षा

शिक्षा

माझे वडील हाडाचे शिक्षक.  गणित व विज्ञान हे त्यांचे आवडते विषय. हे विषय शिकवताना ते पूर्णपणे रमून जात. देवास चे महाराज यांना  शिकवावयाला  ते जात असत.  त्यांना त्या वेळेस महाराजांची बग्गी घ्यागला यायची.  जितक्या अपुळतेने   ते शिकवत, तितकेच ते   अत्यंत शिस्तप्रिय होते.

डिसेंबर चा महिना होता. ग्वाल्हेर ची थंडी.  रात्रीचे  तापमान ४ किंवा ५ डिग्री होते. मी पांघरुणात   बसून गणिताचा अभ्यास करीत होतो. माझे वडील बाजूलाच होते ,पूर्ण चादरीचा आत , पण जागे  होते.  चादरीच्या आतून माझा अभ्यास ते घेत होते.

मी प्रश्न वाचायचा व त्याला कसे सोडवावयाचे ह्याचे  उत्तर माझ्या वडिलांना सांगायचे. ते ठीक असले तर तो प्रश्न मी लिखित सोडवावयाचा , असे त्यांनी मला सांगितले. पहिला प्रश्न वाचला आणि तो कसा सोडवावा हे मी सांगितले .  "ठीक, प्रश्न सोडव. " माझ्या वडिलांनी सांगितले.मी प्रश्न सोडविला . "उत्तर बरोबर आहे ना " त्यांनी विचारले.

मी पाहिले की पुस्तकात   उत्तराचा कागद नव्हताच .मी अत्यंत   घाबरून गेलो.  मला त्या थंडीतही घाम सुटला.

" हो " मी उत्तर दिले. 

दुसरा प्रश्न. इथे पण तोच प्रकार घडला. पुन्हा मी "हो" उत्तर देऊन सुटलो.

तिसरा प्रश्न. त्यात माझ्या वडिलांना काही कनफ्युजन झाले  आणि त्यांनी विचारले "उत्तर पुस्तकात काय लिहिले आहे ". मीं काय बोलणार ? मी  काहीच उत्तर दिले नाही. काहीं वेळ शांततेचं  गेला . "वडील झोपले असतील" असा विचार करत असतानाच " उत्तर काय आहे" असा प्रश्न यांच्या कडूंन आला . " उत्तराचे पान मिळत नाहीं" असे मी घाबरत घाबरत सागितले. " पुन्हा पाहा," माझ्याव वडिलांनी सांगितले. " उत्तराचे पान नाही"  असे मी सांगितल्याबद्दल माझे वडील उठले.व  मला तितक्या थंडीत फरफटत बाहेर नेले.  थंडीने व भीतीने मी अर्धमेला झालो होतो. " तू माझ्या बरोबर खोटे बोललाच ? " मला तेथे बाहेर ठेवून ते आतमध्ये निघून गेले. मी थोड्या वेळ तिथेच थंडीमध्ये उभा राहिलो व एकदम  माझ्या आई ने मला एकदम आत घेतले व पांघुरणात  लपेटले. 

दुसऱ्या दिवशी माझ्या आई ने माझ्यासाठी गरम गुलाब जामुन बनविले. व माझ्या कडून हे वचन घेतले की मी कधी खोटे बोलणार नाहीं.

ह्या गोष्टीला आता ६५ वर्षे झालेत, पण ही आठवण माझ्या मनात नेहमीच राहील.

वडिलांचा धाक आणि आई ची माया ह्याचे एक उदाहरण.

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू