पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अहंकार



अहंकार



अभिमान अतिरेकी 

मनी फुलवी अंगार

क्रोध पेटतो मनात 

त्याचे नाव अहंकार


मग स्वतःचा स्वताला 

वाटू लागे अभिमान

खोट्या प्रतिमा करती 

आयुष्याची धूळधाण


कंसा अहंकार झाला

तोच रोग शिशुपाला

त्यांना वधण्यास स्वये

विष्णू भुमीवर आला


अहंकार दुष्टचक्र

राग उभा वाढवते

राम-रावणाचे युद्ध 

रामायणी घडवते


अहंकार हलाहल 

असे योग यमघंट

विष प्राशिले शिवाने

जगी झाला निळकंठ


मुळासह उपटावा

अहंकाररुपी रोग

मग उजळे प्राक्तन

टळतात पाप भोग




     ©️ गजानन तुपे

    96992 46358


16 डिसेंबर 2018...


बर्‍याच गोष्टींचे अर्थ लागले असतील किंवा नसतीलही...विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी कधीही संपर्क करू शकता...????????????




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू