पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हरितालिकेचा उपास

रात्रीचे अडीच वाजले होते.  शीलाने(नाव बदललेलं ) शेवटी लॅपटॉप बंद केला.  झोपायला गेली इतक्यात तिला आठवले उद्या  हरितालिका आहे.   कामाच्या गडबडीत नारळ वाल्याला फोन करायचा राहिला होता.  आता तिला  पहाटे आणखी  लवकर उठावे लागणार होतं.  3 तासाच्या  तुटपुंजा झोपेनंतर बिचारीने साडेपाचला उठून साबुदाण्याची खिचडी टाकली. 

 आज हरितालिका.  खरंतर हरितालिकेला निर्जळी उपवास करतात,  तरी आजकाल फळे खाऊन रात्री रुईच्या पानावर दही खाऊन उपास सोडतात. 

 हिचे सासर टिपिकल ऑर्थोडॉक्स धार्मिक होतं.  सासु बिचारी सत्तराव्या वर्षी उपास करते, तिला निदान खिचडी खाऊन तरी उपास करणं क्रमप्राप्त होतं. 

 

 अर्णव (नाव बदललेलं ) पुरोगामी विचारांचा होता. 

 नवऱ्यासाठी  बायकांनी उपास करणे हा प्रकारच त्याला चिड आणणारा होता. 

 "आज कालच्या  पिढीला  उपास झे प तो कुठे?"

 असा सासूने मारलेला टोमणा हसतवारी नेऊन  शीलाने तिचा खिचडीचा डबा भरला. 

 अजून नारळ आणायचे होते.  लॉक डाऊनच्या काळात नारळ वाला घरी आणून नारळ देऊ शकत नव्हता शेवटी तीच स्टेशनला जाऊन नारळ घेऊन आली  राजधानी एक्सप्रेस स्पीडने पूजा करून लॅपटॉप घेऊन निघाली.  ऑफिसात पोहचली.  तीन दिवस गणपतीची सुट्टी असल्याने.  वेगवेगळे M. I.S. आणि प्रेझेंटेशन बनवायचे असल्याने,  आल्या आल्या लगेच कामाला सुरुवात केली.   नव्वद टक्के काम दुपारी तिने पूर्णही केलं. 

 

 आज कालच्या जागरणामुळे,  सकाळी लवकर उठल्यामुळे,  उपास असल्याने,  तुला खूप ऍसिडिटी झाली होती.  डोकं  खूप दुखत होत.  इतक्यात  बॉस च्या केबिन मधून फोन आला.  प्रेझेंटेशन मध्ये काही चेंज करायचे आहेत.  काहीच slides  परत बदलून दिल्या.  तितक्याच  डेडिकेशनने संध्याकाळपर्यंत काम करून.   सगळं काम पूर्ण करून.  बॉसला e मेल  करून  घरी जायला निघाली.  खुर्चीवरून उठली तर डोकं गरगरायला लागलं होतं.  डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं झालं होतं.  तिच्या लक्षात आलं  कामाच्या गडबडीत डब्बा  खाल्ला नव्हता. 

तिला चक्कर येत होती आणि उलट्या होत होत्या. 

  जिन्याच्या कठड्याला  पकडून ऑफिसच्या बाहेर कशीतरी आली.  आणि घरी जायला रिक्षा केली आणि नवऱ्याला फोन केला. 

 रिक्षातच परत एकदा अर्ध्या वाटेवर चक्कर आली.

 

 दिड दोन मिनिटांनी सावरुन तिने परत नवऱ्याला फोन केला.  कुठल्यातरी  खानावळीचा जवळ नवऱ्याने तिला रिक्षा थांबवायला सांगितले,  डोकं गरगर  होतं हात पाय दुखत होते.  उलट्या होऊन तीला  डीहायड्रेशन झालं होतं. 

  खाणावळी जवळ नवरा वाट बघत बसला होता. 

 तिच्यासाठी तीचा आवडीचा  फालुदा  ऑर्डर करून ठेवला होता.  ती म्हणाली अरे अर्णव  माझा उपवास आहे. 

 तो म्हंटला " माझी शपथ आहे आधी हे सगळे संपव ." दिवसभराच्या उपवसानंतर,   सहन न होऊन डोळ्यात पाणी आणून हा फालुदा खाल्ला. तीला  आता बरं वाटत होतं. 

 हरतालिकेचे व्रत तर मोडलं होतं.  पण  समजूतदार नवर्‍याच्या रूपाने  हरितालिका  आधीच पावली होती

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू