पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

विडंबन गीत

धावत्या स्क्रीनवरती असशी खेळाला तत्पर

लेकरा, तू वेडा गेमर 


खुर्ची, हेडफोन्स, कंट्रोलर तारा 

तूच जमवीसी सर्व पसारा  

तल्लीनता मग ये आकारा 

तुझ्या बोटांच्या वळवळीला नसे अंत ना पार 

लेकरा तू वेडा गेमर 


कॅरॅक्टरांचे रुप आगळे

प्रत्येकाचे कंट्रोल वेगळे

तुझ्याविणा ते कोणा न कळे

मुखी तुझ्याच असतो मोद , माझ्या मुखी अंगार 

लेकरा तू वेडा गेमर 


तूच उभारसी, तूच तोडीसी

लेव्हल्सचा तू खच पाडिसी 

न कळे यातून काय मिळवीसी

सुंदर डोळे परी निर्मीसी तयापुढे अंधार 

लेकरा, तू वेडा गेमर 


( सतत व्हीडीओ गेम खेळणाऱ्या लेकामुळे वैतागलेल्या आईच्या भावना व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न)


©® धनश्री दाबके


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू