पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पावसाळा

हाती चहाचा कप

अन् बशीत गरम कांदा भजी

गळ्यात एक सुरेल तान

अन् सर्वांचे मूड फ्रेश छान

म्हणून मला पावसाळा आवडतो..


सांधे दुखी च्या त्रासात

चहाचा कप हातात

उबदार रजईत बसून

घरातूनच पावसाच्या सरी घ्याव्यात लुटून

म्हणून मला पावसाळा आवडतो..


सारखे सारखे ते लाईट जाणे

पुन्हा पुन्हा नेटचे  बंद होणे

पण त्या मुळेच कां होईना

सर्वांचे बरोबर बसून गप्पा करणे

अन् म्हणूनचं मला पावसाळा आवडतो...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू