पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पेन

                         पेन


      आच पेनाचं महत्व कोणालाच नाही. कोणीही पेन वापरत नाहीत. खिशामध्ये पाचशे रुपयांची पेन ड्राईव्ह मिळेल पण पाच रुपयाचा पेन मात्र मिळणार नाही.

     पूर्वी पेन म्हणजे साक्षरतेचे प्रतीक समजलं जायचं. प्रत्येकाच्या खिशाला एकाद दुसरा पेन असायचाच.खिशाला पेन नसणारा विरळाच.पेन म्हणजे अद्न्यावर प्रहार करण्याचं एक अस्त्र. पेन म्हणजे लेखणी.सरस्वतीचे एक अस्त्र. शस्त्राने केलेला प्रहार माणसाला एकदाच मारून टाकतो पण  पेनांन केलेला प्रहार मरेपर्यंत मारत असतो. लेखणीच्या जोरावर पुराण, वेद,इतिहास जिवंत आहे. महाभारतातली शस्त्रं कुठे गेली काही माहीत नाही. त्यांचा आज लवलेशही नाही .पण कुरुक्षेत्रावर भगवंतानी सांगितलेली गीता मात्र आज जिवंत आहे. हे सगळं लेखणीचे सामर्थ्य.

     आज मात्र हा पेनाचा सर्वांना विट आला आहे. आज हा पेन कोणाला नकोसा वाटायला लागला आहे. कोणीही पाच रुपयाचा पेन बाळगत नाही. गरज नसते असे नाही. पेनाची गरज कधी लागेल काही सांगता येत नाही . पेनची गरज संपली नाही आणि संपणार पण नाही.कारण पेनाच्या जोरात आजचा वर्तमान भविष्यात इतिहासरुपाने जिवंत राहणार आहे.

     मी पेन बाळगतो. नेहमी बाळगतो.मला काही गरज नाही त्या महागड्या पेनांची. मी साधा पाच,दहा रुपयांचा सेलो पेन वापरतो.अतिशय सुंदर हळूवार लेखन करता येते. खिशाला पेन आहे म्हटल्यानंतर कधी  मी रस्त्याने जात असेल तर कोणीतरी हाक मारतो,

     " एस्क्युज मी ,जरा पेन देता का?"

    मी थांबतो. पेन देतो. त्यांचं काम झाले की पेन खिशाला लटकवतो व पुढे सरकतो.आपल्या पेनामुळे कोणाचं तरी काम झाले याचं समाधान वाटते.

     एकदा एका विवाहसमारंभाला गेलो होतो. एका महाशयानी पेन मागितला.मी दिला. प्रेझेंट पाकीट वर नाव लिहायचे होते.  तो  पाच मिनिटं पेनाशी खेळला. नंतर आरामात विचार करून नाव लिहीलं व पेन माझ्याकडे सरकवत बोलला,

    "पेन तुमचाच आहे नां?"

   कधीकधी विचित्र लोक भेटतात. कुणाच्या तरी  खिशाला पेन आहे म्हटल्यावर त्यावर आपला जन्मजात अधिकार आहे असं  असं वाटणारी.

    एकदा बसला चालो  होतो.बस लागली होती.थोडंसं धावतच मी चाललो होतो. एका माणसाने मला हटकलं,

    " दादा, जरा पेन देता का?"

    " बस लागली हो, बस निघून जाईल."

    "कशाला काळजी करताय राव बसची,पाच पाच मिन्टाला बस आहेत."

    नाईलाजाने थांबलो. बस चुकवली. पण एखादा दिलगिरीचा शब्द सुद्धा नसतो ह्या लोकांच्या कडून.

    एकदा बँकेत गेलो होतो.चेक जमा करायचा होता.स्लीप लिहिली.पाळीत उभा राहिलो. पेन हातातच होता,गरज लागणार होती.कारण आपल्या कडून काहीतरी लिहायचं राहते आणि हे नंतर लक्षात येते. तोवर समोर बसलेला एक माणूस माझ्याकडे आला व बोलला,

   " जरासं पेन देता का?"

   " मला लागणार आहे."

   " अहो, मी काय कुठे पळून जात नाही."

   नाईलाजानं आणि नाराजीनंच दिला.

   मी विंडोला उभा राहिलो. काऊंटरवर चेक दीला. मॅडमनी हातात घेतला नीट भरला का ते पाहिलं व त्या बोलल्या,

   " डेट पूर्ण भरा."

   तरी वाटलंच होतं.स्लीप हातात घेतली. माझा पेन घेणारा माणूस पेनशी खेळत, गप्पा मारत बसलेला दिसला.मी त्याला हात केला पण त्याचं माझ्याकडे लक्ष नसावं! माझी चुळबूळ सुरू झाली. माझ्या मागं खूप माणसं होती. माझ्या मागचा माणूस अवघडला.त्याने आपला पेन माझ्या हातात दिला व बोलला.                          

     " घ्या पेन, आटपा लवकर?"

    मी पेन हातात घेतला. तारीख अपडेट केली. पेन त्याला परत दिला आणि म्हटलं,

    " अत्यंत आभारी आहे."

    मी काउंटर सोडलं आणि त्याचा आवाज ऐकला,

   " एक साधा पेन ही वापरता येत नाही लोकांना.'

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू