पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कालिंग... पार्वती

मला बरोबर आठवतंय .... 21 तारखेला सकाळी सात वाजता बाल्कनीत बसून दुसरा चहा घेता घेता न्यूज पेपरची न्याहारी करत होतो तेवढ्यात फोन ची घंटी वाजली ... इतक्या सकाळी कोणाचा बरं फोन असेल ... विचार करता करता फोन घेतला ... "मी पार्वती बोलतेय"

पार्वती आमच्या कामवाल्या बाईचे नाव आहे ... म्हटलं ... आज बहुतेक ही कामावर येणार नाही म्हणून फोन केला असेल ... मी लगेच उत्तरलो ," हे पहा सुट्टी घेऊ नको .. आधीच घरात बरेच पाहुणे आहेत . . काम पण जास्त आहे" 
ती म्हणाली ... "मी काही तुमची कामवाली पार्वती नाही ... गण्याची अाई बोलतेय ..."
मी म्हणालो .. "कोण गण्या??

... ती उत्तरली ,"अरे मूढ माणसा .. गणपती ची आई पार्वती .. महादेवाची बायको पार्वती ... काही डोक्यात शिरलं का??" 
मी तर सुन्नच झालो .. "म्हणजे देवी पार्वती??? 

ती म्हणाली .. "हो .. देवी पार्वती"

विश्वास बसत नव्हता .. तरी
मी फोन वरच तिला मनापासून नमस्कार केला ... विचारले .. "काय देवी आई ... आज मला कसा काय फोन केला ?"
त्या नंतर माझे तिच्याशी आणि तिच्या मुलाशी म्हणजे गण्याशी .. नव्हे .. गणपतीशी जे काही बोलणे झाले .. तेच तुम्हाला सांगत आहे ....
ती म्हणाली ..." उद्या पासून गणपती उत्सव सुरू होतोय .. तुम्ही.. तुमच्या परिवाराने आणि समाजाने त्याच्या स्वागताची खूप तयारी केली असेल .." 
मी म्हणालो, "हो ना .. आम्ही आतुरतेने वात पाहतोय त्याची" देवी म्हणाली,"अरे पण हा गण्या हट्ट करतोय की मी पृथ्वी वर जाणार नाही म्हणून ... त्याला आजकाल मुळीच आवडत नाही तिथे ..
आता तूच त्याला समजावं ... हे घे बोल त्याच्याशी ..." असे म्हणून तिने गणेशाला फोन दिला ...
मी अजून ही भारावलेल्या अवस्थेतच होतो .. किंबहुना .. सून्नच होतो ...
इतक्यात पलीकडून फोन वर आवाज आला ,"गजानन बोलतेय." मी पुन्हा नमस्कार केला .. म्हणालो ... "बोल बाप्पा ... का रे आमच्या वर नाराजी ?"
तो म्हणाला .. "नाराज का नाही होणार .... तुम्हीं माझ्या पूजनाचा नुसता देखावा करता .... अरे .. काय त्या माझ्या मूर्ती बनवता रे .. पँट घातलेला ... डिस्को नाच करताना ... स्कूटर वर बसलेला ... आणि कसले ते प्लास्टर of पेरिस ... काय ते भडक रंग ... पर्यावरणाला किती नुकसान होते त्याने ..
काय ते माझ्या मिरवणुकी मधे फालतू फिल्मी गाण्यांवर .. त्याहून जास्त फालतू तुमचे नाचणे .... छ्या .. मला अगदी पटत नाही ...

आणि काय रे .. माझे प्रत्येक अंग काही तरी शिकवण देत असते .... मोठे कान .. मोठे पोट ... माझी लांब सोंड ... इतकेच नव्हे तर ... छोटा उंदीर सुद्धा बरेच काही सांगतो .... काही माहित आहे का ??
कसे माहित असेल .. मोठ्यांचे तुम्ही ऐकत नाही ... आणि वाचायची आवड पण नाही ....
तुम्हीं मला मती (बुद्धी) चां देवता म्हणता ना .... मग स्वतःच्या मतीची माती न करता थोडी मती घ्या ना माझ्याकडून ...
*खरं सांग* .... मागच्या 15 दिवसात एकदाही खोटे बोलला नाहीस .. ?
एकदाही कोणाची निंदा केली नाहीस ?
15 दिवसात एखादे परोपकाराचे काम केलेस ??
आपले काम पूर्ण इमानदारीने केलेस ???
पृथ्वीची प्रदक्षिणा म्हणून मी माझ्या आई वडिलांची प्रदक्षिणा केली .... आणि पृथ्वी वर आई वडिलांसाठी वृद्धाश्रम ??? काही लाज वाटते का रे ??
मंदिरात जातो आणि सतत काही ना काही मागत असतो माझ्या कडे .. आणि इतर देवांकडे ...
कधी एकदा तरी निव्वळ दर्शना साठी म्हणून आलास ???
स्वतःला ब्राह्मण म्हणवतोस ... एक तरी खरा ब्राह्मणाचा गुण उरला आहे का तुझ्यात ...
मला म्हणतोस .. की मी तुझे कार्य निर्विघ्न संपन्न करावे ..... पण काय रे .... खरे सांग ... तू कधीच कोणाच्या कार्यात विघ्न आणली नाही ???
कधी वाईट वर्तन केले नाही ??
मग का रे येऊ मी तुझ्या कडे ..????."

तो बोलत होता .. मी ऐकत होतो ....

"माझी आरती सुद्धा तुम्हाला स्पष्ट आणि शुद्ध म्हणता येत नाही ... अथर्वशीर्षाची आवर्तनं करता .... अर्थ माहित आहे का ??

चल ते जाऊ दे ...

एक अजून सांगतो ... शिव पार्वती मला आई वडील म्हणून लाभले ... म्हणून माझी सर्जरी करून मला नवीन मस्तक मिळाले ... पण तुमच्या बाबतीत तसे होणे शक्य नाही ... मग 10 वेळा सांगून ही स्कूटर चालवताना हेल्मेट का नाही वापरत रे ...
तुला वाटते .. की गणपती उत्सव म्हणून मी तुझ्या कडे 10 दिवस यावं ... पण तुझ्या कडे न यायला माझ्या जवळ बरीच कारणे आहेत ..

जाऊ दे ... मी किती ही बोललो तरी तुला काहीच फरक पडणार नाही ..."

मी निशब्द होतो ... डोकं सुन्न झालं होतं .. आज पर्यंत मला असे कुणी झापले नव्हते ..... पण गजाननाचे म्हणणे ही बरोबर होते .... मला एखाद्या प्रचंड धबधब्यातून गेल्या सारखे वाटत होते ...

तो परत म्हणाला ... "काय विचार करतोय ... ?"

मी केविलवाणे म्हणालो ," चूक झाली गणराया ... तुझा एकूण एक शब्द हृदयात उतरला आहे .. आता मी तू सांगशील तसेच करेन ... पण तू उद्या आमच्या कडे नक्की ये ...... येणार नाही असे म्हणू नकोस प्लीज ..."

तो म्हणाला ...
"अरे मी तर तुझ्या जवळच असतो .. तुझेच लक्ष नसते माझ्या कडे ... मी तर फक्त भक्ति भावाचा भुकेला आहे .. देखावा मला मुळीच आवडत नाही .... माझ्या साठी जे करशील ते फक्त आणि फक्त पूर्ण मनापासून ... साधे पणाने ... निस्वार्थ भावनेने .. करणार असशील तरच मी येईन ...

आणि ही ... ह्या वर्षी मला गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत रोज .... अगदी रोज ... तुझी एक वाईट सवय पण दुर्वांवरोबर वाहून दे ... म्हणजे निर्माल्याचे विसर्जना बरोबर वाईट सवयींचे पण विसर्जन होईल ... आणि तू निर्मळ होशील ...."

मी लगेच होकार दिला आणि म्हणालो ... "हो देवा ... मग येतोय ना उद्या ...??"
त्याने पण हसत हसत होकार दिला .. आणि माझ्या उत्साहाला उधाण आले ... म्हणालो .. "ये देवा ... आम्ही सगळेच तुझी खूप आतुरतेने वात पाहतोय ..."
तो परत हो म्हणाला ... आणि आम्ही दोघांनी फोन खाली ठेवला ....

आश्चर्य मिश्रित आनंदाने आणि उत्साहाने ... मी बायकोला हे सगळे सांगायचे म्हणून आवाज द्यायच्या आधी ..... तिचाच आवाज कानावर आला …... काय आज उठायचे नाही का ... 10 वाजायला आले .. "चला उठा लवकर आणि ..उद्याच्या तयारीला लागा ... गणपती आणायचे आहेत ना ????"

म्हणजे ... पार्वती .. गणपती ... फोन ... हे सगळे स्वप्न होते तर ???
लगेच उठलो ... विचार केला की स्वप्न असले तरी .... फोन वर जे काही बोलणे झाले ... ते वस्तुतः सत्यच होते .... आणि मी ठरवले की *मति ची माती हाऊ देणार नाही* गजाननाने सांगितल्याप्रमाणे च मी करेन .... बायको ला सगळे सविस्तर सांगितले ... आश्चर्य चकित झाली ती ... आणि ती पण तसेच करावयास लगेचच तयार झाली ...
*तर आम्ही उभयतां तर तसेच करणार आहोत ...*

*आणि तुम्हीं .....??*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू