पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

थांबला तो संपला

थांबला तो संपला
                                                                  
         " मेडम बघाना  लाजू  कशी करते, ब्लेड नी
    हाथ कापत होती, मी  सरळ तुम्हास  कड़े धरून आणले आता तुमीच हिला समजवा .तुम्हासनी माहिती आहे ना की  माझा जिउ कि प्रान हाय त्यी.."
         अलकाने तिला लगेच जवळ घेतले ." लाजू हे काय करते बेटा तुझी आई तुझ्या विण ज़गू शकेल का तूच सांग ."
असं पाउल उचलण्या पूर्वी आपल्या आईचा विचार कसागं नाही केलास तू  ".

    लाजू ढ़साढ़सा रडू लागली," काय करनार मेडम किती कष्ट सहन करू तुमीच सांगा त्या पेक्षा मरण परवड़ल .पण या माझ्या माय करता माझा पण जिऊ तुटतो .."
"हो न बेटा तू तर  किती शाहणी आहेस ..पुन्हा कधी असा विचार मनात आणू नकोस. समज़लं ना ..वाटेल तर नवरा सोड़ ! तो वाइट आहे तर तुला शिक्षा कां मिळावी . 
तुझी आई तुला अंतर देणार नाही पण बाळा असा विचार कधीच करू नको .  बैस मी तुला चहा करते..काही खाऊन पण घे."
            गॅस वर चहा ठेऊन पोरीला भाजी पोळी खायला दिली. इतकी वाळली होती पोर . आई लेकी चहा पीत होत्या आणि अलका  लाजूची समजूत काढ़त होते.
               लाजू शिकलेली समज़दार मुलगी, तिची आई म्हणजे लक्ष्मी , अलका कड़े गेले वीस वर्षा पासून काम करते. ती कामाला लागली तेव्हां खूपच सरळ आणि घाबरलेली असायची .सासरचे़ जे म्हणतील तेच 
करायचे हेच तिला माहित .  
माहेरी तशी तिची बरी परिस्थिति होती .वडिल ड्रायव्हर होते तर खाऊन - पिऊन सुखी होते . त्या शिवाय तीन भाऊ आणि एक मोठी बहिण लग्न झालेली .तिघे भाऊ पण काम करायचे .त्यामुळे एकुण परिस्थिति बरी होती. 
           लग्न करून ती नाशिक हून देवास ला आली .
सासरी लग्न झालेला मोठा दीर . जाऊ म्हणजे 
तिची चुलत बहिणच होती .आणि एक छोटा दीर व लग्न झालेली नणंद .
             लक्ष्मी ला दोन मुलं आणि एक मुलगी ही लाजू . परिस्थिति साधारणच .  तिचा नवरा म्हणजे़ रागिष्ट आणि शंकाळु प्रव्रुत्तिचा माणुस . रागाच्या भरात मालकाशीच भांडुन बसे .त्या मुळे सारखी नौकरी सुटायची .पोरं मोठी होत होती  तर  पैश्याची गरज़ लागणारच . 
     अश्या परिस्थितित लक्ष्मी कामाला बाहेर पडली.
पहिल्यांदा कुठल्यातरी फॅक्ट्री मधे कामा साठी लागली ५०० रु. महिना आणि आठ तास काम , ते ही खूप श्रमाचे काम . काही दिवसानी अलका ने तिच्या सासू ला सांगितल कि त्या पेक्षा तिला  स्वयंपाकाच  काम  करायला सुचवा म्हणजे तिला सोपे होइल. 
               अशी ती अलका कड़े पोळ्या करावयास लागली . आणि ते अजून चालू आहे .
                 लाजूला पण ती शिकवत होती . अलका
ने सांगितल्या प्रमाणे ती मुली आणि मुलान मधे भेद करत नव्हती  . लाजू 'बी. बी .ए' .च्या पहिल्या वर्षाला होती. अलका ने‌ लक्ष्मीला सांगितलं " लाजू हुश्यार आहे  तिला मना सारख़ शिकु दे" .लक्ष्मी जे मेडम म्हणत सर्व ऐकायची .
       लक्ष्मी ने न सांगता सुट्टी केली . एक दिवस ,दोन दिवस करता करता तब्बल १५ दिवस झाले .आता अलकाच्या  रागा चे रूप काळजी न घेतले  होते . तिला काळजी मुळे काही सुचे नास झालं होतं  .
              १६ दिवसानी लक्ष्मी आली .चेहरा उतरलेला
कमजोर झालेली. तिला बघताच अलका ने  विचारले  काय झाले लक्ष्मी....
              बांध फुटल्या सारखा लक्ष्मी च्या डोळ्यातून अश्रुधारा वहात होत्या .
          " रडून झालं आता; बस कर लक्ष्मी काय झाले आहे ते सांग " अलका ने तिच्या खांद्यावर हाथ ठेवला .
         " मेडम  लाजूचे लगीन लाउन दिले .संजय  बरबर ती पळुसनी गेली मग तिचे लगीन करावे लागले.
म्हास्नी लई बोलनी  खायला लागले‌ मेडम. कुनी पन माझ्या संग बोलत नइ . सगले म्हास्नी दोष देत आहे . मिनि तिला शिकायला घातले म्हनून असे झाले  .आता मी काय करू?"
            लक्ष्मी ड़ोकं  धरून बसली होती . अलका
तिला समजवत होते ."अगं थोड़ा धीर धर .या सगळ्या वर काळच औषध आहे .थोड्या दिवसातच सगळ विसरुन ते  लाजूला  पण माफ करतिल . तू काळजी करू नको. "
          हळु - हळु सगळ मावळत गेलं . एक महिन्यातच लाजू गरोदर  झाली .आता लक्ष्मी ची काळजी वाढ़ली . लाजूची सासर ची परिस्थिति बरी होती त्यामुळे काळजी कमी होती . वेळशीर तिला छान गोड़ अशी मुलगी झाली . छोट्या बाळाला पाहून लाजूचे वडील आणि भाऊ पहिलेचं सर्व विसरले . लाजूच़े माहेरी छान बाळणपण झाले .  आणि ती सासरी परतली . 
           सासु - सासर्यांनी तिचे कौतुक केले पण तिला
संजयची नज़र काही वेगळी वाटली.  तिला वाटलं आपण उगाच शंका करतो . पण तसे नाहीं.. बायकांना 
जो नज़र ओळखायचा देवाने गुण दिला आहे तो सहसा चुकत नसतो . काही तरी  गड़बड़ आहे तिला समज़लं .तशी लाजू  हुश्यार होती .  थोड़ लक्ष दिल्यावर
तिच्या लक्षात आलं कि संजय  कोणी मुलीशी सतत् गोष्टी करतो . आणि मग स्पष्ट झाले तो टीना नावाच्या मुली च्या नात्यात अड़कला होता . तिने दोघांना समज़वण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला 
नाही. घरात भांड़ण  आणि वाद झाला पण संजय  काही ऐकायला तयार नव्हता .
       रागा च्या भरात  लाजू ने ब्लेड ने हाथ  कापायचा प्रयत्न केला होता.  दवाखान्यात  टाके लागले  . मग लक्ष्मी तिला घेउन माझ्या कड़े आली .

          शेवटी लाजू घर सोडून मुलगी प्रीतीला घेऊन माहेरी आली .या वेळी वडिलांनी आणि भावांनी तिची साथ दिली . तिने बी बी ए. चे दूसरे वर्ष  लग्ना नंतर पास केले होते आता तीसर्या वर्षाचा फॉर्म भरला आणि एका शाळेत नौकरी ला लागली . प्रीती आणि स्वतः चा खर्च  लाजू स्वतः उचलत होती. लक्ष्मी ला कधी- कधी खूप वाइट वाटायचं. 
   "लाजूला सतत् टोमने  ऐकावे लागतात हो मेड़म 
  फकस्त एकोस्नविस सालाची आहे कशी आयुस्य काढनार ती "
      खरं तर अलकाला ही तिची काळजी होती पण लक्ष्मीला सान्त्वन देणे जरूरी होत . तिला सांगितले अगं काळजी करू नको .तिच्या आयुष्यात काही तरी छान घडणार आहे . देव कधी तरी आपली परीक्षा घेत असतो. या वेळी तू खचून गेलिस तर  लाजूला कोण संभाळणार .

          देवा माझी पण परीक्षा घेतोस का तू . मी छान घडणार सांगितले आणि दूसर्या दिवशीं निरोप आला लक्ष्मी चा जावई संजय ने आत्महत्या केली . अलका स्वताःशी पुटपुटली . कारण त्या टीनाने  कोणी अमर बरोबर  लग्न केले .
             लाजू पुन्हा एकदा  दुखावली गेली तिने खऱ प्रेम केलं होत  संजय  वर!   
         पुन्हा गाड़ी रुळावर यायला थोडे़ दिवस लागले.
आता लाजूने बी बी ए पूर्ण करून बी एड़ ला एडमिशन घेतली होती . लहान बाळ प्रीती  चे सर्व काम आता लक्ष्मी वर आले होते . ती फक्त अलका कड़े येत होती .देव कृपेने तिच्या नवर्या ची नौकरी चालली होती. 
          लक्ष्मीला लाजूच्या पुढल्या जीवनाची काळजी
होती .
      "  लक्ष्मी नुस्त बसून काळजी केल्यान काही होणार नाही "
      " काय करू मेडम ; तुमीच सांगा "
      " तुला कृति करावी लागेल , प्रयत्न करावे लागतिल " 
     मग काय अलका आणि लक्ष्मी ने चुपचाप प्रयत्न सुरु केले  . नलिनी नावाच्या बाईचा पत्ता काढ़ला . ती  लग्न जमवत होती .आणि मोडलेले लग्न जमवण्यात तिचे वैशिष्ट्य होते . 
         तिने २-३ मुलं दाखविली. एक मुलगा आला पण त्याला प्रीती बरोबर यायला नको होती !! आम्ही परभारे त्याला नकार दिला .
त्या नंतर २ मुल आले पण काही तरी कारणानी जमलं नाहीं . लक्ष्मी पुन्हा काळजीत पडायची.
      " अगं लक्ष्मी असं लग्न जमायला ज़रा वेळ लागेल तू  ज़रा धीर ठेव ."
      लक्ष्मी लगेच हो मेडम म्हणत कामाला लागली .
काम  करून  ती निघाली आणि  फोन वाजला .नलिनी चा फोन होता , अलका ने  लगेच लक्ष्मीला आवाज़ दिला आणि फोन उचलला  . 
             हॅलो!!!!!
          "अलका ताई मी नलिनी बोलते"
               "  हां बोल नलु "
          "  ताई खूप छान स्थळ मिळाल आहे . आणि त्यांना आपल  सगळ आवड़लं आहे "
        " अगं नलु ते लोक सधन आहे आपण कसं करू" 
   " तुम्ही काळजी नका करू सगळा खर्च तेच देणार "
           "पण अस कां ग " 
      " काही गड़बड़ तर नाही न ,नाहीं तर ' आसमान से गिरे खजूर में अटके ' तसं नको ." 
तस काही नाही .त्यांच्या समाजात मुली मिळत नाही म्हणून ते गरीब घरची मुलगी करतात . लाजू चांगली शिकलेली मुलगी म्हणून ते तयार झाले .मुलाला एक मुलगा आहे. 
           लक्ष्मी ला सगळं सांगितलं .आम्ही पुढ़ल्या 
  तयारी ला लागलो .
          मुलगा म्हणजे संदीप  आणि मुला कड़चे लोक खूप समंजस .
                 लाजू दिसायला तर छान होतीच पण तिच्या चेहर्या वरचा आत्मविश्वास तिला जास्त सुंदर बनवत होता .लग्न लगेच ठरल़ . संदीप ने एक मोठी रकम लाजू आणि तिच्या मुली च्या नावाने एफ.डी  . करून दिली कारण लाजूला प्रीती ची काळजी वाटत होती .

लक्ष्मी ने या लग्ना साठी दिवस - रात्र एक केले होते पण लग्न झाल्याने तिची मैहनत सफल झाली .

       "मेडम मी माझ्या कडून पूर्न प्रयत्न केले आता तिचे भाग्य "

          लाजू आणि संदीप चे लग्न संदीप च्या गावी जाऊन झाले . आणि लाजू च्या जीवनात  सुखाचे क्षण आले. तिचा परिवार संदीप , आकाश आणि प्रीती बरोबर पूर्ण झाला होता .
संदीप खूप समज़दार आणि समंजस मुलगा होता .त्यानी लाजू आणि प्रीती ला आपलसं करून घेतलं . लाजूने ही संदीप चा मुलगा आकाश ,  त्याला 
आईचं प्रेम दिल .त्याला खेळायला छोटीशी बहिण मिळाली .
           लाजू भावाच्या लग्ना साठी माहेरी आली आणि लॉकडाउन मधे अड़कली .लग्न ही थोड़ पुढ़े वाढ़लं . काही दिवसांनी लग्न घरात ल्या घरात करायच़ ठरल़ . 
        तेव्हां उद्या संदीप येणार होता . लाजू सकाळ पासून आनंदित होती .

११ वाज़ता घरा बाहेर लाल रंगाची गाड़ी येऊन थांबली सगळे आश्चर्या ने बाहेर आले .
        "  कोण आलं गाड़ी ने आपल्या कड़े "?
गाडीचे दार उघडून संदीप आणि आकाश  बाहेर आले .बाहेर येताच त्याने सर्वान कड़े स्मित हास्य करत बघितले  . गाड़ी कड़े हाथ दाखऊन म्हणाला .....
         " सरप्राइज़ फॉर लाजू ऍन्ड़ प्रीती ".
लक्ष्मी च्या डोळ्यातून अविरल अश्रुधारा आनंदाच्या वहात होत्या ......
           
                    
             ‌                        सुनिता डगांवकर
                                        देवास .
 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू