पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्राण्यांची सभा

प्रण्यांची सभा ( बाल कविता)


सभा भरली प्राण्यांची

विषय होता भारी

पण घरीच निजून होती

वनराजाची स्वारी ...............


सारे होते चिंतेमध्ये

सभा कोणी घ्यावी

प्रत्येकजन म्हणत होता

खुर्ची मला हवी ....................


वाघोबाच्या डरकाळी ने

जंगल मग हदरले

मी मी करणारे

होते सारे घाबरले  ................


आवाजाने जागा होऊन

वनराजाही ऊठला

डोलत डोलत येऊन तो

खुर्ची मध्ये बसला .................


पाहुन त्याला तिथे

शांत झाले सगळे

विषय सभेचा कोणता ?

विचारते झाले बगळे ..............


राजा म्हणे झोप झाली

आता लागली भुक खुप

सांगा कुणाच्या रक्ताचे

मी पिऊ आज सुप ...............


ऐकुन त्या विषयाला

सगळेच झाले घामाघूम

एका क्षणात साऱ्यांनी

सभा सोडून ठोकली धुम ............


ईकडे तिकडे पहात एकटी

राजाची स्वारी बसली

प्राण्यांची सभा पुन्हा एकदा

निर्णय न होताच संपली ..................

निर्णय न होताच संपली ..................


©® दिपक जोशी

चिखली , जि - बुलढाणा

9011044693

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू