पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मेघ

.मेघ


तृषार्त धरेच्या कणाकणांतुन

मेघ वाहतो चराचरातुन

अवखळ खळखळ माथ्यावरती

कुठे तुंबतो छपरावरती

संथ वाहतो राऊळ द्वारी

वाऱ्यासंगे धावे स्वारी

पाहुनी थांबला कातळ ओला

नभी सजली सप्तरंगी माला

उसंत घेउनी दोन क्षणांची

पुन्हा पुरवतो आस मनीची

असा संपला कोसळतांना

तृप्त करुनी कणाकणांना

तृप्त करुनी कणाकणांना........



©® दिपक सुर्यकांत जोशी

चिखली , जि :- बुलढाणा

9011044693

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू