पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्पर्श - एक अनुभूती

*स्पर्श*

*(एक संस्मरण)*

 

लिहिणे.. बोलणे.. इशाऱ्यानी गोष्टी करणे .. असे किती तरी दृष्य - श्राव्य माध्यम आहेत अभिव्यक्तीचे.

किती तरी प्रकार असतात स्पर्शाचे .. प्रत्येक स्पर्श आपल्याला किती तरी वेगवेगळे ज्ञान आणि अनुभव देऊन जातो ...

मोठ्या माणसांनी आपल्या डोक्यावर  आशीर्वादाचा हात ठेवल्याचा स्पर्श ...  वडील माणसाने किंवा गुरु ने पाठीवर हात ठेवल्याचा शाबासकी चा स्पर्श..

आपल्याच लहान मुलाने किंवा मुलीने  सुरक्षित वाटावे म्हणून आपल्याला बिलगून केलेला स्पर्श ..

लहान बाळाच्या गालावर आई - वडिलांनी लाडात केलेला स्नेहाचा स्पर्श ....

नवरा-बायकोच्या आपसातील प्रेमाचा स्पर्श ..

आई वडिलांनी रागात दिलेल्या धपाट्या चा स्पर्श ..

एखाद्या लंपट माणसाने केलेला किळसवाणा स्पर्श..

मित्राने केलेले हस्तालोंदन म्हणजे परस्पर विश्वासाचा स्पर्श ...

भांडणात कुणी धक्का दिल्याने झालेला स्पर्श ...

घाबरु नकोस .. सर्व ठीक होईल .. मी आहे ना ... असे म्हणत मित्राने किंवा मोठ्या माणसाने खांद्यावर हात ठेवल्याने झालेला सांत्वनेचा आणि धीराचा  स्पर्श ..

आपण कुणाचे काही चांगले केले असल्यास त्याने आभार स्वरूप हलकेच आपला हात दाबल्याचा कृतज्ञतेचा स्पर्श ...

 

प्रत्येक स्पर्श काही तरी वेगळे सांगून जातो ...

 

माझ्याच आयुष्यातील एक घटना याच स्पर्शाचे संस्मरण म्हणून देत आहे ....

नागदा जंक्शन या ठिकाणी नोकरीला असताना मी तिथल्या रोटरी क्लब चा सुद्धा मेंबर होतो .. जवळजवळ 15 वर्षाच्या माझ्या रोटरी सदस्य तेत समाज कल्याणाचे खूप प्रकल्प राबवले ..

वर्ष 2003 - 04 मधे असाच एक प्रकल्प हाती घेतला होता .. गरजू व्यक्तींच्या डोळ्याच्या मोतीबिंदू शल्यक्रिया चा ...

अहमदाबाद इंदोर आणि नागदा येथील एकूण चार डॉक्टरांची टीम होती.

पहिल्या दिवशी पेशंट चेक अप करून त्याला शल्यक्रिया साठी आयडेंटिफाय करणे ..

आणि मग दोन दिवस त्यांच्यावर शल्यक्रिया करून नवीन लेंस बसवणे असा उपक्रम ठरवला.

सर्व पेशंट साठी .. चेकअप ऑपरेशन आणि पोस्ट ऑपरेशन केअर .. काळा चष्मा सकट दवाखान्यात असतानाची त्यांची भोजन व्यवस्था इत्यादी सर्व निशुल्क होते. आसपासच्या गावातून आलेल्या लोकांना तिथेच 3 दिवस ठेवून .. पोस्ट ऑपरेशन चेक अप करूंन मगच घरी पाठवायचे ठरले होते.

 

पहिल्या दिवशी आयडेंटिफिकेशन ची वेळ संपली होती आणि जवळजवळ 125 पेशंट शल्य क्रिये साठी आयडेंटिफाय केले गेले होते. ..

आम्ही आवराआवरी करून घरी जाण्याच्या तयारीत होतो.. तेवढ्यात एक गावठी म्हातारी वय 72 वर्ष .. हळूहळू काठी टेकत टेकत  माझ्या जवळ आली ... म्हणाली .. बेटा ..म्हारी भी आंख देख ले .. म्हारे कई नी दिखे ...

मी तिला सांगितले की मी डॉक्टर नाही म्हणून आणि आमची वेळ सुद्धा संपली आहे ....

तिने खूप विनवण्या केल्या .. तिला कुणी नातेवाईक नव्हते .. आणि ती जवळच्या गावातून 8  किलोमीटर पायी चालत आली होती ... अक्षरशः रडायला लागली ती ...

काय माहिती काय होतो तिच्या त्या विनवणी मधे .. आम्हीं तिला मदत करायचे ठरवले ... डॉक्टरांशी बोललो तिचे चेकअप केले गेले .. डॉक्टर म्हणाले ... दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू आहे ... पण एकदम दोन्ही डोळे करता येणार नाही ... एका महिन्यात एक आणि पुढच्या महिन्यात दुसरा ... असे करू.

 

दुसऱ्या दिवशी तिचे ऑपरेशन झाले ... आम्ही कार्यकर्ते .. येऊन जाऊन सगळ्या पेशंट ची जमेल तशी सेवा करीत होतो .....

त्या दिवशी तिच्या बेड पाशी मी जाऊ शकलो नाही ... दुसऱ्या दिवशी मी तिच्या बेड पाशी गेलो .. आणि विचारले .. अम्मा ..कैसी हो ?

तिने माझा आवाज लगेच ओळखला ... आणि हाताच्या इशाऱ्याने मला जवळ बोलावले .. मी तिथे असलेल्या स्टुला वर तिच्या जवळ बसलो ... तिच्या एका डोळ्या वर पट्टी होती .. पण

दुसऱ्या मोतीबिंदू ग्रसीत डोळ्यात असलेली चमक आणि अश्रू मला स्पष्ट दिसत होते.

तिने माझा हात तिच्या क्षीण पण प्रेमळ हातात घेतला .... आणि हलकेच दाबला .... पुटपुटली ...

 

आणि..आणि..आणि

निशब्द झालो मी .. ती अनुभूती अक्षरशः अनिर्वाच्य आहे ...

माझ्या संपूर्ण अंगावर शहारे आले.

 

तिच्या मुखात डॉक्टर .. रोटरी क्लब ... कार्यकर्ते सगळ्यांसाठीच आभार होते ... आणि तो हलकेच हात दाबलेला स्पर्श.. हे देवा ssss .. काय नव्हते त्या स्पर्शात ...  कृतज्ञता .. करूणा .. शाबासकी .. स्नेह.. धन्यवाद.. आशीर्वाद

सगळे काही त्या एकाच स्पर्शात मला अनुभवले..

तो स्पर्श आणि ती अनुभूती सदैव माझ्या स्मरणात राहील. बहुतेक हीच अनुभूती आपल्याला फक्त स्वतःसाठी न जगता गरजू लोकांसाठी सतत काही तरी करत राहण्या साठी प्रेरित करत असते आणि आत्मिक समाधान सुद्धा देते.

माझी परमेश्वराला हीच विनंती आहे की  *स्वयं से बढ़ कर सेवा* हे ब्रीद सदैव माझ्या आणि तुमच्या ध्यानी मनी राहो.

 

  - अशोक गोखले

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू