पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दैनंदिन दासबोध: आढावा

दैनंदिन दासबोध.


सहज लक्षात आले की आपण दोघी मैत्रिणी काही नवीन वाचन करून आपल्या वेळेचा सदूपयोग करू या.नुकतेच माझ्या पतीदेवांनी नवीन पुस्तके विकत घेतली होती ती बघून तसेही रोजच्या रोज मनात विचार यायचा की आपण याचे वाचन करूया. जवळच एक मैत्रीण राहाते कुणास ठावूक तिच्याही मनात एकदमच आले काही वाचन करण्याचा विचार. लगेच दिलिप अंबिके लिखित "दैनंदिन दासबोध" हातात घेतला, वेड लागल्या सारखे रोज वाचन होऊ लागले. वर्षात रोज एक या क्रमाने ३६५ओव्यांचे वाचन सुरु केले. संपूर्ण दासबोधात तर वीस दशक ,व प्रत्येक दशकात दहा समास असे एकुण दोनशे समास आहेत. मैत्रीण रायपूरची असल्याने, संपूर्ण शिक्षण हिंदीत झाल्याने तीने हे छोटे पुस्तक निवडले. कारण तीचे म्हणणे एकदम बरोबर होते की मला स्पष्ट उच्चारण तर करता आले पाहिजे. वाचता वाचता तीने खूप वेगाने व स्पष्ट उच्चारण सहित वाचले. इतकेच नव्हे तर त्यात तीला व मला खूप रस ही येवू लागला. आम्ही जे वाचले त्याचा सार असा......दासबोध म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचीच वचने आहेत. आत्माराम हा ग्रंथाचा कर्ता आहे. जो दासबोध मनापासून वाचेल त्याचा अभ्यास करेल तो ब्रम्हज्ञानी बनून जाईल.परमार्थ म्हणजे काय हे कळू लागेल. देह पंचभूतांचा बनला असून अंतरात्मा खरा कर्ता आहे. सर्व कर्तेपण जगदीश्वराचे आहे. दासबोधातील प्रत्येक ओवी आपणास प्रंपचातून परमार्थाकडे नेते. जगामध्ये सर्व देहामध्ये अंतरात्मा विभागलेला आहे. प्रत्येकामध्ये त्याचा अंश आहे. त्या देहाचे जेवढे सामर्थ्य असेल तेवढेच कार्य जगदीश्वर त्या देहाकडून करवून घेतो.परब्रह्म हाच या विश्वाचा मुख्य असून माया हा दूसरा जिन्नस आहे. पंचमहाभूते हा तिसरा जिन्नस असून या विश्वरचनेवर सतत रात्रंदिवस मनन करणे म्हणजे स्वरूप दर्शन होय.आत्माराम ओळखावा,देहाचा भरवसा नाही म्हणून सावधपणे वागावे. लोकांसाठी जेवढे करता येईल तेवढे करावे. आत्मनात्म विवेक व सारासार विचार या द्वारे लोक कल्याण साधावे. परमार्थ साधना करीत श्रवण,मननामध्ये आपला काळ घालवावा. देहाशिवाय परमार्थ होऊच शकत नाही. देहाशिवाय ज्ञानाचा प्रसार होऊ शकत नाही. आपण आपल्या मनाचा अभिमान बाजूला सारून सदवस्तूचे रूप पहावे. निदिध्यास घेऊन तिच्याशी तद्रूप व्हावे. सदगुरु मिळाला तर कार्य लवकर घडते. सर्वांना संतुष्ट राखावे. कोणाला दुखवू नये.भगवंताची भक्ती करून जीवन सार्थकी लावावे.ब्रम्हदेवाने हा प्रंचड प्रपंच निर्माण केला आहे, त्याची खूप वाढ झाली आणि अखेर त्यास मानवदेहाचे उत्तम असे फळ आले. मानव देहासारखे दुसरे यंत्र या विश्वात उपलब्ध नाही आणि या देहात अंतरात्मा आहे. अध्यात्माच्या श्रवण मननाने हा विवेक साधतो.विवेकाने आत्मस्वरूप ओळखले की जन्म सार्थकी लागून संपूर्ण समाधान लाभते. श्री समर्थांनी दासबोध लिहून साऱ्या जगावर अनंत उपकार केले आहेत.


सौ. उज्वला दीपक कर्पे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू