पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पाठवणी

संकेतसोबत आपल्या लाडक्या लेकीला सप्तपदी चालतांना बघून बाबांचे डोळे भरून आले.आपली लाडकी पिहू आज आपल्याला सोडून स्वतःच्या नव्या संसाराला सुरवात करणार ह्या विचाराने एकाच वेळी आनंद आणि वियोगाचे दुःख जाणवत होते.सगळे विधी संपले आणि पाठवणीची वेळ झाली.

बाबांच्या गळ्यात पडून रडणाऱ्या पिहूला समजावत तिच्या सासूबाई म्हणाल्या"अग,ही जगरीत आहे.माहेरच्या अंगणाचा निरोप घेऊन सासरच्या अंगणात मुलीला रूजावंच लागतं. आता माहेरचे पाश हळूहळू कमीच करावे लागतील.आता नव्या आयुष्याची सुरवात कर"

त्यांचे बोलणे ऐकून पिहू म्हणाली"आई, मी नव्या घरात नवी नाती जोडीन सांभाळेन पण त्यासाठी मी जुनी नाती नाही विसरणार.मी निरोप माहेरच्या अंगणाचा घेतेय माहेरच्या लोकांचा नाही.मी आयुष्यभर दोन्ही घरांचा आधार असेन"


अनघा जगदळे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू