पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आयुष्याचे शिल्पकार

शिक्षकाला पुढच्या पिढीचा शिल्पकार म्हटले जाते. तोच पुढच्या पिढीला घडवतो. गुरुचे स्थान प्रत्येकाच्या जीवनात फार विशिष्ट आणि महत्वाचे असते. आपल्या आयुष्यात सर्वप्रथम आपले आई-वडिलच आपले गुरू, शिक्षक असतात.


माझ्या आयुष्यात आई-वडिलच माझे शिक्षक होते. त्यांनी त्यांच्या शिकवणीनेच मला आयुष्य भराचे संस्कार दिले. त्या नंतर शाळेत गेल्यावर तर किती तरी शिक्षक, गुरू मला लाभले. अगदी आजही मला प्राथमिक, माध्यमिक शाळेत ले शिक्षकही आठवणीत आहे. ते सर्व खूप प्रेमाने व आपुलकीने शिकवायचे. त्यांनी च तर माझ्या आयुष्याला शिक्षणाने एक नवीन वळण दिले. ११वी नंतर काॅलेज साठी मी देवासला एका प्रायव्हेट काॅलेज मध्ये जात होते. तेथे आमच्या प्रिंसिपल जाधव  मला शिक्षक म्हणून लाभल्या. त्यांनी पुस्तकातल्या धड्यां बरोबरच आयुष्याचे धडे ही खूप छान शिकवले. खूप प्रेमळ आणि अतिशय हुशार व्यक्तिमत्त्व. माझा मराठी साहित्य हा विषय असल्याने तेथेच मला मराठी साठी देवासचे राजकवी श्री. गोविंद राव झोकरकर सर शिकवायला होते. अगाध ज्ञानाचा भंडार, आणि कवी तर होतेच. त्यामुळे तो काळ तर माझ्या साठीचा सुवर्ण काळ होता. तो काळ तर मी आयुष्यभर कधी विसरुच शकत नाही. असे दोन मोठे महत्त्वाचे शिक्षक लाभल्याने मी स्वतः ला खूप भाग्यवान समजते.


पुढच्या आयुष्यात ही शिक्षण संपले तरी मला खूप शिक्षक भेटले. शिक्षक म्हणजे नुसते अभ्यासा पुरता नसतात, तर जीवनात ज्या ज्या व्यक्तीं कडून आम्हाला काही शिकायला मिळालं ते सर्वच आमचे शिक्षक. खरं तर संपूर्ण आयुष्यात आम्हाला भेटणाऱ्या सर्वच लोकांकडून काही न काही शिकायला मिळते. अगदी आमचे शेजारी-पाजारी, नातेवाईक आणि आमचे मित्र-मैत्रिणी. कारण आमच्या आसपास जितके लोकं आहेत त्या सर्वां मध्ये काही न काही गुण लपलेले असतात. आम्ही नेमका तो गुण ओळखून त्यांच्या कडून घ्यायचा असतो.तो गुण त्यांच्या वागणुकीतून च आम्हाला शिकवलेला असतो. अगदी एका भेटीत ही माणसे बरेच काही शिकवून जातात.

आमची पुढची पीढी आता आमच्याहून जास्त हुषार आहे. वेळोवेळी त्यांच्या कडून आम्हाला डिजिटल ज्ञान मिळतं. त्यांनाही थैंक्स..


मला माझ्या जीवनात आसपास असे खूप शिक्षक भेटले. त्यांनी सर्वांनीच आपल्या वागणुकीने माझे आयुष्य खूप समृद्ध केले आहे. आज शिक्षक दिवसाच्या निमित्ताने त्या सर्वांची आठवण करून मी सर्वांचे खूप खूप आभार मानते. व त्या सर्वांना धन्यवाद देते. माझ्या जीवनाला योग्य तो आकार देऊन माझं आयुष्य सुंदर करणाऱ्या व मला घडवणाऱ्या, आयुष्यातल्या त्या प्रत्येक व्यक्तीला, शिक्षकाला, शिक्षक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू