पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अंगणात मी

.अंगणात मी ............


मायेचा तो पदर घेऊनी

रोजच लपलो अंगणात मी ............

आभाळातले मोजत तारे

कितीदा निजलो अंगणात मी ............

गप्पांचे ते फड सजवुनी

कितीदा बसलो अंगणात मी ............

कैक प्रसंगी ऊठल्या पंक्ती

पोटभर जेवलो अंगणात मी ............

गर्मीचा ही दाह शमवण्या

कितीदा फिरलो अंगणात मी ............

गोठवणाऱ्या थंडीमध्ये

ऊब शोधली अंगणात मी ............

छत्री उडता वाऱ्यासंगे

चिंब भिजलो अंगणात मी ............

'लवकर या ' ची आर्जव ऐकता

कितीदा वळलो अंगणात मी ............

दमुनी येता कामावरुनी

ऊच्छवास सोडला अंगणात मी ............

सजलेले रंग रांगोळीचे

बघुनी सुखावलो अंगणात मी ............

उद्विग्न होऊनी कधी त्रासलो

ऊत्तर शोधले अंगणात मी ............

चाहुल येता चार सुखांची

बेहोश नाचलो अंगणात मी ............

किलबिल धडपड बालपणीची

कितीदा स्मरतो अंगणात मी ............

कैक स्मरणे आयुष्यातले

सोडुन आलो अंगणात मी ............

दोन दिसांच्या भेटीमध्ये सारे स्मरते

कातर होतो अंगणात मी ............

निरोप घेतांना त्या अंगणाचा

रेंगाळत राहतो अंगणात मी ............

रेंगाळत राहतो अंगणात मी ............


©® दिपक सुर्यकांत जोशी

चिखली , जि :- बुलढाणा

9011044693


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू