पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शिकवण देती वृक्षवल्लरी

5 सप्टेंबर ला शिक्षक दिना निमित्त काही तरी लिहिण्याचा मानस होता ... विचार केला की आपल्या आवडत्या शिक्षका बद्दल काही तरी लिहू ... माझे सौभाग्य की लहानपणापासूनच शाळेत प्रत्येक विषयासाठी उत्कृष्ट कोटीचे शिक्षक लाभले ... घरात आई-वडील, आजी - आजोबा आणि बाहेर इतर नातेवाईक .. शेजारी-पाजारी, मित्रमंडळी .. आणि समाजात संपर्कात येणाऱ्या सगळ्याच व्यक्तींकडून खूप काही शिकत आलो.

जीवनात परिस्थिती आणि अनुभवाने पण खूप शिकवण दिली. भरगच्च आणि अमोल साठा आहे अशा शिकवणीचा आणि आठवणींचा.

त्यामुळे सगळ्यात आवडता शिक्षक कोण ... हा निर्णय घ्यायला त्या दिवशी तरी मला काही जमले नाही.
मला वाटते की आपण फक्त व्यक्तींकडूनच शिकतो असे नाही.
तसे पाहायला गेले तर आपल्या दैनंदिन व्यवहारात फक्त व्यक्तीच नव्हे तर इतर प्राण्यांपासून पासून सुद्धा शिकण्यासारखे बरेच काही नक्कीच आहे.
गणपतीचे मोठे कान .. मोठे पोट लांब सोंड आपल्याला बरेच काही शिकवत असते.
हत्तीचा संथपणा .. मुंगीचे सतत चालत राहणे (एखाद्या मुंगीला खूप वेळ एकाच ठिकाणी थांबलेले पाहिले आहे कधी ??) .. चीत्याचे धावणे .. वाघाचे चालणे .. सिंहाचा निडर पणा .. हरणाचे निरागस डोळे ... गायीचा साधेपणा .. कोल्ह्याची लबाडी ...
सर्पाची किंवा खारीची चपळता ..
सगळेच शिकण्या सारखे नाही का ??
मी तर वस्तूंपासून सुद्धा शिकत आलो आहे.
पेन पेक्षा पेन्सिल बरी .. कारण काही चुकले तर .. खोड रबरने मिटवता येते .. पण पेनने लिहिलेले मिटवता जरी आले तरी डाग सोडून जाते .. यातून काही शिकता येईल का ??
पतंग उंच उडते .. पण तिला ती उंची देणारा दोरा आणि दोरा धरणारा हात जमीनीवर असतो .. त्यांनी साथ सोडला की पतंग परत खाली येतो ..
नारळ बाहेरून कठोर असतो आणि आत मध्ये ?? आई-वडील किंवा गुरु चे अनुशासन आणि स्नेह - ममत्व असेच नाही का ??
एखाद्या फुलापासून सुद्धा शिकता येते ... विस्कळीत झाले तरी आपला सुगंध सोडीत नाही .. आपला व्यवहार सुद्धा असाच असला तर ...?
हिमालय पर्वत तर खूपच काही शिकवत असतो .. उंची ... धैर्य ... चॅलेंज ... खूप कठीण वाटचाल .. साैंदर्य ..... भयावहता .. किती तरी तऱ्हेने पाहता येते हिमालयाकडे.
अजून बरीच उदाहरणं देता येतील ..
असो...
तर मग मी ठरवले की मला ज्याच्या पासून सर्वात जास्त शिकायला मिळाले ... मी त्याच्या बद्दल लिहीन.
आणि परत एकदा विचार चक्र सुरू झाले. 4 दिवस हाच विचार करण्यात गेले.
आणि सापडले .. ठरवले ... की आयुष्यात मला सगळ्यात जास्त जंगलातील झाडांनी शिकवले आहे ... म्हणून आता त्या बद्दल थोडे ..

रेल्वे किंवा बस ने लांबचा प्रवास करताना जंगलातील झाडे सगळ्यांनीच पाहिली असतील. कोणी लावले ती झाडं .. ?? कोणी त्यांना वेळेवर पाणी घातले का ?? जनावराने खाऊन ना टाकावे .. म्हणून कोणी ट्री गार्ड लावले का ?? कीडे लागून झाडं असमयी मृत्युमुखी ना पडावे म्हणून कोणी कीटनाशक शिंपडले का ??
त्याचे वाढणे बरोबर व्हावे .. म्हणून कोणी वेळोवेळी त्याचे कटिंग केले का ??? या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
' नाही ' असेच आहे.

तरीही ते झाड मूळ धरत पूर्ण ताकदीने शक्य तितकी उंची नक्कीच गाठते ... त्याचा फांद्या शक्य तितक्या पसरतात सावली देतात .. शक्य तितकी पाने फुले फळे त्याला लागतात .. जमिनीत त्याची मुळं सुद्धा खूप खोल वर जातात जमिनीतून स्वतः साठी अन्नाची सोय करायला ..
नैसर्गिक रीत्या लागलेलं ते एवढंसं .
'बी ' कोणतीही मदत नसताना .. आपली उमेद सोडत नाही ... जमिनीतून मिळेल तसं.. मिळेल ते घेऊन निस्वार्थपणे जगत असतं .. सावली देत असतं .. पांन फुलं फळ देत असतं ....
खूप हिवाळा .. प्रचंड गर्मी ... अतिशय पाऊस ... तुफान वारा हे सगळे सुद्धा ते झाड सतत झेलत असतं. कधी कधी वेळ पडल्यास थोडंसं लवून परत ताठ उभं राहत.

हे सगळे जर आपण झाडापासून शिकलो तर जीवनाची धन्यता होणार नाही का .. ??
म्हणून म्हणतो ...
माझा सर्वात आवडता ... प्रिय शिक्षक म्हणजे कोणत्याही जंगलातील प्रत्येक झाडं ..
त्यास माझा त्रिवार नमस्कार.
????????????

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू