पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

साद

निःशब्द मी,निशब्द तू.

का हरवलाय आपल्यातला संवाद?कुठे हरवलं आपल्यातलं प्रेम?

हे आपलं घरटं तू आणि मी मिळून सजवलेलं.इथली एकएक गोष्ट आपण मिळून घेतलेली.आधी कामावरून येतांना आपल्याला एकमेकांची आणि घराची ओढ असायची.आस होती ती फक्त दुडदुडणाऱ्या पावलांची.जी नाही उमटलीत इथे.

वर्षामागून वर्षे सरली, आणि आसही संपली.आपणही हळूहळू मिटत गेलो.कामात बिझी असल्याचा मुखवटा धारण करून आपण जगतोय.जणू आयुष्य ढकलतोय.घरात दोन अनोळखी लोक राहतायत असं वाटतयं. एका घरात राहतो म्हणून सहजीवन म्हणायचं का रे?वाटतयं जणू दोन तीरावर दोघे आपण.परत नव्याने एकत्र येऊ का आपण?


तुला परत साद घालायची आहे मला.आपल्यातील दुरावा घालवायचाय.माझ्या हाकेला ओ देशील ना?जन्मभराची साथ निभवायची मला.


तुझीच प्रिया



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू