पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

लघुकथा

                फिरुनी नवी जन्मेन मी

​       हम थे जिनके सहारे वो हुवे ना हमारे

        डुबे जब दिल की नैय्या सामने थे किनारे "


अनामिका ऊठली आणि तीने रेडीओचे बटन बंद केले. आधीच उदास असलेल्या मनस्थितीत या गाण्याने अधिकच भर घातली. नुकताच गुरुचा येऊन गेला होता. फोन वरील संभाषण तिचा पिच्छा पुरवत होते. गुरु आणि ती एकमेकां वर प्रेम करत होते. ती त्याला पती मानत होती. कायदेशीर विवाह झाला नव्हता परंतु दोघांनी मंदीरात जाऊन देवाच्या व तीच्या मैत्रीणीच्या साक्षीने विवाह केला होता. दोघांच्या जाती भिन्न असल्या मुळे त्याच्या घरुन विरोध होता. तो त्याच्या घरच्यांना मनवणार होता आणि ते कायदेशीर पति पत्नी होणार होते. त्याच्या बोलण्यावर भरोसा ठेवुन तीने पाऊल पुढे टाकले होते. परंतु नंतर तीला जाणवले की हे फक्त त्याचे नाटक होते. तीचे शरीर मिळवण्यासाठी. कारण तो तिला पुर्णपणे जाणुन होता विवाहा पुर्वी ती त्याला स्पर्श करुन देणार नाही. तिची मानसिकता जाणुन तो हा मंदीरातील विवाहाचा डाव खेळला होता. हे फक्त त्याचे नाटक होते तिच्या शरीरा पर्यंत पोहोचण्या साठी. हा त्याचा छंद होता  स्ञियांच्या मनाशी आणि शरीराशी खेळण्याचा. तो पक्कं जाणुन होता कुठलीही स्ञी मनाने जेंव्हा पुरुषाला आपला पति मानते तेंव्हाच प्रथम आपलं मन आणि नंतर शरीर त्याच्या हवाली करते.  गुरुचा हा  डाव जेंव्हा तीच्या लक्षात आला तेंव्हा ती आपलं सर्वस्व जो तीचा अभिमान होता ते गमावुन बसली होती. अश्वत्थाम्या सारखी भळभळती जखम ऊरात घेऊन बसली होती. स्वतालाच विचारत होती असा कसा आपला तोल गेला? असे कसे आपण आपले स्वत्व गमावुन बसलो? कीती जणानी प्रयत्न केला होता तीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा पण तीने कोणालाच दाद दिली नव्हती. तीला माहीत होतं आपल्या समाजात एकटी स्ञी म्हणजे प्रत्येकाला सार्वजनिक मालमत्त्ता वाटते. कुणीही यावे टीचकी मारुन जावे अशी अवस्था. समाज कीतीही सुधारला असो परंतु पुरुषांचा स्ञी कडे बघण्याचा द्रुष्टीकोन बदलला नाही याचा तीला पदोपदी अनुभव येत होता. त्यामुळे ती आणखी सावध होऊन स्वताला जपत होती. 


         परंतु गुरु तीच्या आयुष्यात आला आणि चकवा लागल्या सारखी स्वताला हरवुन बसली. सारासार विवेक गमावुन बसली. मंदीरात विवाह केला आहेच आता घरच्यांच्या संमत्तीने कायदेशीर विवाह करुन सुखी संसाराच स्वप्न ती जागेपणी पहात होती. सुरुवातीला सर्व काही छान होते. ते त्याच्या  फ्लँट वर भेटत होते. बायको प्रमाणे ती त्या घरात वावरत होती. कर्तव्यदक्ष पत्नी प्रमाणे त्याची सेवा करत होती. सुरवातीचं एक वर्ष छान गेलं.  या दीवास्वप्नातुन तीला जाग आली जेंव्हा तो तीला टाळायला लागला तेंव्हा. भेटण्याचं प्रमाण कमी झाल. नंतर फोन काँल्सना तुटक रीप्लाय. तीने आग्रह  केल्या वर ऊपकार केल्या सारखे भेटणे. सुरुवातीची ओढ तो आवेग कुठेच दीसत नव्हता. तीच्यावर विनाकारण चिडणे डाफरणे हेच वारंवार होऊ लागले. अनामिकेला त्याचे हे वागणे नविन होते.  त्याचे हे बदललेले वागणे तीला सहन होत नव्हते. त्याच्या वागण्याची चीड यायची पण दुसर्याच क्षणी त्याच्या बद्दलच्या प्रेमाने मनं भरुन यायचं. 


     तीला स्वताच्या कमकुवत मनाची चीड यायची. यातुन बाहेर कसे पडायचे ते कळत नव्हते. शेवटी तीने निर्णय घेतला आपण स्वताला कशात तरी गुंतवुन घ्यायचे. एखादा आवडीचा अभ्यासक्रम पुर्ण करुन त्यात प्राविण्य मिळवायचे. आयुष्याचे भरकटलेले तारु कीनार्या वर आणायचे ते ही कुणाच्या मदती शिवाय. मदत घ्यायची ती फक्त परमेश्वराची. हा निर्णय घेतल्या वर तीला एकदम मोकळे वाटु लागले. ती बाल्कनीत येऊन आकाशा कडे पाहु लागली. तीच्या मना प्रमाणेचं मघाशी मळभ आलेले आकाश निरभ्र झाले होते. ती खुशीतचं घरात आली आणि तीने रेडीओ आँन केला गाणे चालु झाले एकाच या जन्मी जणु फीरुनी नवी जन्मेन मी. ते गाणे आपल्या साठीच लावले आहे असे वाटले तीला.  गाणे गुणगुणत ती आपल्या कामाला लागली




स्मिता पांचाळ



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू