पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सुरवंटाचं फुलपाखरू

सुंदर सोज्वळ दिसणारी आणि साधी राहणारी ऋतूजा म्हणजे लाजाळूच झाड.सतत घरकामात असणारी आणि अजिबात सोशल नसणारी ऋतू म्हणजे त्या उच्चभ्रू सोसायटीमधला चेष्टेचा विषय.ऋतूला हे सगळं ठाऊक होतं पण ती दुर्लक्ष करायची.

एका दिवाळीअंकासाठी कवरपेज म्हणून अस्सल मराठमोळ्या  स्त्रीच्या फोटोसाठी ऋतूचा फोटो काढायला सोहम् तिच्या खूप मागे लागला.खूप समजवल्यावर बरेच आढेवेढे घेत ऋतू तयार झाली.आभूषणांनी सजलेल्या आणि सोज्वळतेने नटलेल्या आपल्या चेहऱ्याला पाहून ऋतू स्वतःच्याच पुन्हा प्रेमात पडली.आपोआप आत्मविश्वासाचं तेज झळकलं. चेहऱ्यावर मूर्तिमंत लावण्य,आत्मविश्वासाचं तेज आणि गोडवा ल्यायलेल्या ऋतूचा फोटो दिवाळीअंकाच्या कवरपेजवर झळकला.अभिनंदनाचा वर्षाव आणि नव्या ऑफर्स स्वीकारतांना ऋतू आनंदाच्या रंगात न्हाऊन निघाली होती.आयुष्याला नवी दिशा लाभलेल्या सुरवंटाचं आज फुलपाखरू झालं होतं.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू