पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हरी

हरी मम जीवन प्राण आधार 
तुजवाचुन मज नीरस वाटे 
अवघा हा संसार ।।
सुमनातील मधुगंध हरी तू 
इंद्रधनुतील सप्तरंग तू 
तुझिया स्पर्शे उमलून येई 
मरुभूमीत बहार ।।
मेघ होऊनी कधी बरसशी 
तप्त सृष्टीची तृषा शमविसी 
कुरणे शेते वने फुलविसी 
होऊनी अमृतधार ।।
बालमुखातून कधी बोलसी 
रानफूल होऊन डोलसी 
कोकीळकंठातून छेडीसी 
कोमलसा गंधार ।।


कल्पना प्रशांत कुलकर्णी 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू