पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गझल

गझल 

~~~~~

कसे वाहती वारे कळले
अपुले परके सारे कळले .....

जमले नाही कधी ग्रहांशी
पण नभातले तारे कळले .....

उठवत होता जागेवरुनी
त्याला माझे जा रे कळले .....

झोप लागली ज्या सरकारा
त्याला कसले नारे कळले ?

मेसमधूनी डब्बा आला
तेंव्हा गपचुप खा रे कळले .....

जरी जाहला उशीर थोडा
तरी अता मज सारे कळले .....

कामच केले ' दिवाकरा ' ने
उचलत होता भारे कळले .....


दिवाकर चौकेकर,
गांधीनगर (गुजरात)

***********************

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू