पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शिक्षक.

शिक्षक.

उद्या शिक्षक दिन, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. हे आपल्याला अगदी लहान पणा पासून शिकवले व आपण शिकतही आलो. अश्या महान व्यक्ती बद्द्ल अभिमान आणि आदर बाळगत आलो, त्यांना आदर्श शिक्षक म्हणून पूर्ण देश ओळखून आहे. त्या व्यतिरिक्त ज्योतीबा फुले, सावित्रीबाई, अशे कित्येक आदर्श आपल्या देशात होऊन गेले. आजच्या पिढीला अश्या शिक्षकांनी शिकवले असते तर?असा प्रश्न निर्माण होतो. आजच्या शिक्षक व विद्यार्थी दोघांचा विचार केला तर फार बिकट परिस्थिती आहे.विद्यार्थी फक्त शिकायचे म्हणून शिकतो आणि शिक्षक तर त्याहून वरचढ ,आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी,गरजा पूर्ण भागविण्यासाठी शिक्षक नोकरी करत आहे. शिक्षकाला मान,सम्मान, आदर हे मिळेनासे झाले आहे. शिक्षक असावा आदर्श व्यक्तीमत्व असलेला, सदासर्वकाळ विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करणारा पैशाच्या मागे न धावणारा,विद्यार्थ्यांना खरे मार्गदर्शन देणारा, विद्यार्थी बद्दल कळकळ घेणारा. आपल्या समाजात अशे बरेच शिक्षक होऊन गेले ज्यांनी आपले ज्ञान कधीही विकले नाही. शिक्षक हा आपला दूसरा गुरु. म्हणतात ना की पहिला गुरु तर आईच असते. असा शिक्षक जर आजच्या घडीला मला भेटला तर त्याला माझे करबध्द वंदन.

माझ्या लहानपणी मी इयत्ता सहावीत असतांना मेहेंदळे बाई होत्या, आम्ही बाई आणि गुरुजी म्हणत असू.टिचरजी किंवा मडम नाही. मेहेंदळे बाईंना माझे फार कौतुक होते, माझी आई पण एक उत्तम शिक्षिका आहे हे त्यांना ठाऊक होते. आमच्या वर घातलेल्या संस्काराचे बाई नेहमी कौतुक करायच्या. आई नोकरीत असून किती वळण लावले तुम्हाला असे म्हणून पाठीवर कौतुकाची थाप द्यायच्या. माझा वाकून नमस्कार केलेला त्यांना फार आवडे.

कसे होते ना त्या काळी, शिक्षक आपल्याला जिवाभावे प्रेम करत असत. असा एकही शिक्षक नव्हता की ज्यांच्या कडे आम्ही गेलो नाही. त्यांच्या घरी गेल्यावर आदर भावच असे, आणि त्या ही घरातील व्यक्ती सारखे आमच्या बरोबर राहात. आठवीत असताना भंगाळे बाई होत्या त्या मला आईसारख्या.त्यांच्या घरी माझे खूप जाणे - येणे होते.

सांगण्याचा मुख्य मुद्दा असा की त्या वेळी शिक्षक व विद्यार्थी यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, आदर होता, शिक्षक हे आदर्श होते ते सांगतील ती पूर्व दिशा असे होते. आज असा शिक्षक ही होणे नाही व आज्ञा पाळणारे विद्यार्थी ही नाही. शिक्षकांना वाटेल तशी नावे ठेवले जातात.

शिक्षक वर्गात आल्यावर त्यांचा आदर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पूर्वी शिक्षक मुलांना चांगला चोप देत असत, छडी लागे छम छम विद्या येई घम घम.अशी म्हण उगाच नव्हती. आजची परिस्थिती बदलली आहे मुलांवर हात उगारणे, मारणे तर दूर त्यांना रागवणे देखील सक्ती आहे, शिक्षकांना सरकारी कामे ही भरपूर प्रमाणात दिली आहेत,त्यामुळे सुध्दा त्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात अडथळा येत आहे.

असो, माझे सर्वच शिक्षक माझे आदर्श होते व आहे. माझ्या मते सर्वांना आपल्या गुरूजनांचा अभिमान असला पाहिजे.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू