पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आधुनिक चिऊ

अलक

आधुनिक चिमणी आणि कावळा


"हॅलो, मिसेस चिऊ ?" 


"हो. बोलतेय."


"हॅलो मॅम, मी समता को-ऑपरेटिव्ह बॅंकेतून कावळे बोलतोय. मॅम, तुमच्या डेबिट कार्डचं क्लोनिंग झालय आणि तुमचे सेविंग्ज धोक्यात आहेत. तुमचे अकाउंट डिटेल्स, कार्ड नंबर आणि पिन व्हेरिफाय करावे लागतील म्हणजे आम्हाला लगेच दुसरे कार्ड पाठवता येईल व तुमचे पैसे सुरक्षित राहातील. तर करायचं का व्हेरिफिकेशन सुरु?"


"अहो कावळे, तुम्ही को-ऑपरेटिव्ह बॅंकेतून बोलताय की क्रो-ऑपरेटिव्ह? नाही पिन नंबर विचारताय म्हणून म्हंटले. ती पाहुण्याकडून फसलेली चिऊताई खूप मागे राहिली हो आता. ह्या मॉडर्न चिऊला तुमच्यासारखे संधीसाधूपणा करणारे डीजिटल पाहुणे न बघताही ओळखता येतात. तेव्हा परत मला फोन.."  


चिऊचा चिवचिवाट संपायच्या आधीच हा डोमकावळा उडून गेला. 


©® धनश्री दाबके

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू