पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

Take care night will be good

        take care night will be good
               
              Tcgn मराठी चित्रपट  अत्ता च्या काळाची
ज्वलंत समस्या   ' सायबर क्राइम '  वर आधारित आहे.   एका भोळ्या भाभड्या  परिवाराची जन्म भराची कमाई  पणा ला  लागते . तेव्हां संपूर्ण परिवार ह्याच्या विरुध्द लढ़ा घ्यायचा निर्णय घेतो .
                दिग्दर्शक व लेखक श्री गिरीश जोशी यांचा
  दर्जेदार चित्रपट त्यात सचिन खेडेकर आणि महेश       मांजरेकर सारखे अभिनेते म्हणजे़ उत्क्रुष्ट अभिनय बघायला मिळतं . त्यांच्या सोबत अभिनेत्री इरावती हर्षे  व पर्णा पेठे दोघिंनी उत्तम अभिनयाची साथ दिली आहे . 
               चित्रपट  बघतानां  समजतं कि  आपली व्यक्तिगत माहिती सहज़ पणे कुणा समोर बोलुन जाणं
किती घातक होउ शकतं .
' सायबर क्राइम ' वर बनलेला माझ्या मते अत्ता पर्यंत चा सर्वोत्कृष्ट चित्रपट असावा .
                 महानगरात  राहणारा एक मध्यमवर्गीय
परिवारातले  नवरा बायको  यूरोप  ट्रिप करून येतात
आणि त्यांना  कळतं त्यांची जन्म भराची कमाई  एका हॅकर ने चोरली आहे तेव्हां ते स्तब्ध होतात .
                 एक अजून धक्का  मुलगी सानिका मुळे लागतो कारण तिचा नवीन झालेला मित्र एक  अंतरंग विडियो सोशल मीडिया वर पोस्ट करणार असतो .अश्या वेळी एक इंस्पेक्टर (महेश मांजरेकर) ची मदद घेऊन पूर्ण परिवार एकत्र येऊन सामोरी जातो .
                   एक संपूर्ण  चित्रपट , एकही गाण नसतांना  तुम्ही परद्या  वरून डोळे हटवू शकत नाही.
परिवार , मैत्री, नाती , तरुण होत्या मुलांचे आई वडिलांचे  संबन्ध , तंत्रज्ञानाचा वापर  करताना  त्याचे
नफा आणि तोटे किती आहे ते सर्व  सुन्दर रीत्या  दाखवले आहे .
                 आयुष्य जगताना आढ्या वेढ्या वळणावर
धिम्म पणे उभे राहणं गरजे़च आहे .त्यात परिवार  व
मित्र ज़र  सोबत असले तर  प्रवास सोपा होतो .
               म्हणून. Take care......

             

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू