पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पक्षी सहनिवास

सानेकाकांना बागकामाची प्रचंड हौस.भरपूर फुलापानांनी लगडलेली झाडेे त्यांच्या जगण्याची ऊर्जा.त्यावर राहणारे पक्षी म्हणजे त्यांचे मित्रच.ह्यावर्षी वादळामुळे काही झाडे पडली आणि त्यावरची कावळा आणि चिमणीची घरटीही.तुटलेल्या घरट्याकडे आणि अंड्याकडे बघून आक्रोश करणाऱ्या कावळा आणि चिमणीचे दुःख त्यांना पाहवेना.


आज सानेकाकांनी चाफ्याच्या झाडावर दोनतीन बर्ड हाऊस पेंट करून टांगले होते.आत नारळाच्या काथ्या आणि मऊमऊ कापूस ठेवला होता.दर थोड्या वेळाने पाहणी करणाऱ्या कावळा आणि चिमणीला ती जागा आवडली.एका बर्ड हाऊस मध्ये चिमणी कुटुंब आणि दुसऱ्यात कावळे कुटुंब स्थिरावले होते.

कावळा आणि चिमणीला शेणामेणाच्या घरट्यापेक्षा हक्काचे पक्के घर मिळाले.झाडावर टांगलेल्या पक्षी सहनिवासात कावळा आणि चिमणीचा जुने वैर विसरून होणारा एकत्र किलबिलाट काकांना सुखावत होता.


अनघा जगदळे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू