पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गुरुपौर्णिमा


 गुरुपौर्णिमा

 


गुरू म्हटल्या वर आठवतात ती सगळी थोर माणसे ज्यांनी ज्यांनी आपल्याला शिकविले. 


सुरुवात आई वडिलांपासून, मग आपले आजी आजोबा, इतर नातेवाईक. आपले शिक्षक, आपले मित्र, आपले अनुयायी. 

 


पण आपण हे विसरतो की गुरू हा नेहमीच आपल्या पेक्षा मोठाच असावा असे का?


जी व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवून जाते त्याला आपण गुरू म्हणतो. मग ती व्यक्ती आपल्या पेक्षा लहान असो वा मोठी. 

 


मला तर वाटते आपली मुले देखील आपले गुरुच असतात.


मग मुले अगदी तान्ही असो वा शाळा कॉलेज जाणारी. सगळे आपल्याला काही ना काही शिकवतातच.

 


आता बघा ना, एक नवजात बाळ आपल्याला विश्वास ठेवायला शिकवतो. नुकताच जन्मलेल ते बाळ, जगाचा काहीच पत्ता नाही, पण आपल्याला आईला अचूक ओळखून असतं, आणि विश्वास ठेवतं की आईच्या कुशीत आपण सुरक्षित आहोत. 


हळू हळू ते मोठे होत जाते, चेहऱ्यावर  भाव दाखवू लागते. हसू, आसू, क्षणांत बदलते भाव. आपल्याला वाटणाऱ्या अगदी शुल्लक गोष्टी वरून खूप खुश होणार. डब्याच झाकण लावता आले म्हणून आनंद, दरवाजा लावता आला म्हणून आनंद, अगदी खरकटी भांडी जेवणा नंतरची स्वतः उचलून स्वयंपाकघरात ठेवता अली ह्याचा देखील मोठ्ठा आनंद. 


आणि आपण मोठी आणि शहाणी माणसे, आनंद शोधत राहतो. पण तो काही सहज सापडला नाही. म्हणून म्हटलं, ह्या लहान मुलांकडून हे शिकलो की आनंद कसा लहान लहान गोष्टींमधे पण शोधावा. हसावे मन मोकळे करून. आपण म्हणतोच ना कसा लहान मुला सारखा हसतो बघ. का तर तो मन मोकळेपणाने हसत असतो.

 


मग हळू हळू हट्टीपणा वाढायला लागतो. त्या सोबत रडूही लगेच यायला लागते. जिद्दीपणा ही वाढतो. कधी कधी हा जिद्दीपणा बराच काही शिकवून जातो आपल्या सारख्या मोठ्या लोकांना. उदा. एखादी गोष्ट जी आपण नको करू सांगत असतो जसे की उंच बेड वर चढणे.पण मुले शेवटी मुले आपलं ऐकत नाही आणि स्वतः करून बघायचं हे ठरवतातच. प्रयत्ना वर प्रयत्न करतात, पडतात, परत चढतात, जो पर्यंत एकदाचे बेड वर चढत नाही. मग काय परमानंद च जणू. मग आपल्याला जमले आहे हे पाहून तोच खेळ सुरू.


ह्यातून काय शिकण्यासारखं, जिद्दीपणा. लहानपाणी जिद्दी असणं ह्याला फार काही चांगली लक्षणं समजली जात नही म्हणा. पण खरं तर काही तरी मिळवण्यासाठी जिद्द ही लागतेच. म्हणूनच तर म्हणतात प्रयतनांती परमेश्वर.

 


आणखी एक छानसे उदाहरण म्हणजे क्षमपूर्ती करणे. 


आपण आपल्या मुलांवर्ती बऱ्याच वेळा ओरडतो, चिडतो, कधी कधी मारतो देखील. कधी तरी त्यांची चूक असताना किंवा मग कधी तरी नसताना. आपण आपला कुठला तरी राग त्यांच्या वर काढतो. ती बिचारी ऐकून घेतात, रडतात, रुसतात. पण हे सगळे अगदी काही क्षणा साठी. शेवटी ते येतातच परत आपल्या कडे. सगळं विसरून जणू काही झालेच नाही. लगेच विसरतात सगळं कसं . आणि ह्या उलट आपण मोठी माणसं. कसं सगळं मनात ठेवून बसतो. बऱ्याच वेळा सुढ उगवण्याची भावना ही येते. किंवा अबोला धरून बसतो बराच वेळ.ego येतो ना आडवा आपला. 


तर ह्यातून शिकायचं काय तर सगळं विसरून लगेच आपल्या माणसांकडे परत कसे जायचे. मोकळे मन अगदी निरागस, लहान मुलांप्रमाणे, की मग बघा सगळी कडे कसा आनंदी आनंद पसरतो.

 


नेमकं हे सगळं मी स्वतः अनुभवले आहे, जाणले आहे, वाटले आपण पण शिकावे  थोडे आपल्या मुलांकडून. सारखे किती त्यांनाच धडे देत बसावे. 


म्हणून,  गुरू हा कुठे ही असू शकतो. कोणत्या ही वेष माध्ये असू शकतो. 

 


-रचना

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू