पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हसून हसून पोट दुखू लागले.

आणि आमचे हसून हसून पोट दुखू लागले.


नमन साधारण तीन किंवा चार वर्षाचा असेल, आपल्या आजोळी आईबरोबर गेला होता. महिना भर राहून, आजी आजोबा कडून मनसोक्त लाड पुरवून आज तो आपल्या घरी निघणार होता. दुपारी तीन ची गाडी होती. अचानक त्या ला थोडा ताप भरला, वाटेत त्रास नको म्हणून आजीने बाबांच्या मागे लागून त्याला डॉ. ना दाखवून आणले. घरी आल्यावर औषधाची बाटली उघडून औषध देणार इतक्यात त्याने डोळे फिरवले आणि बेशुद्ध झाला, आजीच्या पायाखालची जमीन सरकली, बाबा पण खूप घाबरले. नमनची आई व मावशी तर रडूच लागल्या. आजी राहत होती ते घर एका चाळी सारखे होते मग लगेच खालच्या मुलाला आवाज दिला. तो ही लगेच मदतीला धावून आला आपली लूना घेऊन लगेच निघाला, बाबांनी नमनला हातावर घेतले आणि दवाखान्यात पळापळ. नेमका त्या दिवशी रविवार असल्याने दवाखान्यात डॉ. येत नाही. डॉ. साहेबांच्या घरी जाऊन त्यांना विनवणी करून दवाखान्यात बोलावून आणले, तोपर्यंत हाआपला बेशुद्धच. डॉ. त्याचे भरभर सर्व कपडे काढून टाकले व त्याला डायरेक्ट नळाखाली धरला खूप वेळ पाण्याचा मारा त्याच्यावर होऊ दिला. मगच त्याची शुद्ध आली, तापाचे टेंपरेचर एकदमच शंभर वरून सहा वर गेल्या मुळे अशा प्रकारच्या संकटाला समोर जावे लागले. तो शुद्धी वर आला आणि इकडे तिकडे बघू लागला आपण कुठे आहोत हे त्याला कळत नव्हते मग सहजच त्याचे लक्ष आपल्या अंगावर गेले आणि तो म्हणाला आई मला कपडे घाल, माझे कपडे कुठे गेले? मी नंगुपुंगु कसा?हे ऐकून आमचे हसून हसून पोट दुखू लागले. त्याची प्रकृति आता एकदम छान होती. डॉ. खूप खूप आभार मानून आम्ही दोन दिवसाने घरी परतलो.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू