पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

खोट्याची दुनिया

सरीताचा आज फोन आला "अगं, मॉलला जाऊया का? फेस्टीवल ऑफर सुरु आहेत.चल खरेदीला."

मी म्हटलंं"अग, तुला खरंच घ्यायचं आहे का काही?"
"नुसतं बघून तर येऊ,खरेदीचं नंतर ठरवू"इति सरीता.

आम्ही आमचा मोर्चा मॉलकडे वळवला.तिथे प्रचंड गर्दी होती.ट्रॉलीज भरभरून लोक सामान घेत होते.जणू ह्यानंतर सगळ काही संपलेल असेल ह्या थाटात लोक वस्तू घेत होते.आम्हीपण त्या गर्दीत सामील झालो. तब्बल दोन तासांनंतर हातात भल्या मोठ्या पिशव्या सावरत आम्ही विजयीवीराच्या थाटात घरी पोचलो.

दोन वर एक फ्री,अर्धा किलोपेक्षा दोन किलो वॉशिंग पावडर घेतली तर स्वस्त अशा नानाविध आमीषांना भुलून आम्ही भरपूर अनावश्यक खरेदी केली होती.गर्दीमुळे प्रत्येक गोष्ट तपासून घेता आली नव्हतीच.
कमी किमतीच्या नादात आणलेल्या काहीच वस्तू गरजेच्या होत्या.बाकी आणलेलं सामान जरूरी नव्हतचं. स्वस्त म्हणून उगाचच पर्स,कपड्यांची खरेदी झाली होती. ह्या ऑफरच्या खोटेपणाला भुलून आम्ही भरपूर वायफळ खर्च केला आणि आमच्याच खिशाला चाट बसली होती.

दिव्यांचा लखलखाट,एसीचा गारवा,ढीगाने दिसणाऱ्या वस्तू,ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या ऑफर्सचा भडीमार हे कुठल्याही मॉल मध्ये दिसणारं नेहमीचं दृश्य.यासगळ्या खोट्या दुनियेला ग्राहक बळी पडतो आणि हव्याशा वस्तूंबरोबरच अनावश्यक वस्तूपण घेऊन बाहेर पडतो.

रोज मोठमोठ्या पानभरून येणाऱ्या जाहीराती कमी किमतीबद्दल असा दावा करतात की जणू काही आपल्याला ती वस्तू फुकटच देणार आहेत."ऑफर सीमीत समय तक" ही टॅगलाईन ग्राहकांच्या मनात चलबिचल निर्माण करते आणि आपोआप त्या दुकानांकडे त्यांचे पाय वळतात.

खरंतर कुठलीही वस्तू घेतांना तिची क्वालिटी, उपयोगिता,निकड,रंगरूप हे महत्त्वाचे मुद्दे पण जाहीरातीच्या खोटेपणाला भुललेला ग्राहक सारासार विचार करण्याची ताकद हरवून बसतो आणि भाराभर खरेदी करतो.आपला माल विकला जाणे ही विक्रेत्याची गरज आहे त्यापोटी तो त्या मालाची हरप्रकारे जाहीरात करतो,बरेचदा त्या वस्तूची योग्यता आहे त्यापेक्षा वाढवून सांगितली जाते आणि खोट्या जाहीरातींना आपण फसतो.


आजकाल मोठमोठ्या कलाकारांकडून जाहीरातींमधून त्या विशिष्ट वस्तूची उपयुक्तता तुमच्या मनावर बिंबवली जाते,त्यानां त्याबदल्यात मोबदला मिळतो आणि आपण मात्र त्या वस्तूची सत्यता न पडताळता बरेचदा केवळ त्या कलाकारामुळे त्या वस्तू विकत घेतो.

म्हणून वाटतं "ग्राहक राजा आता तरी जागा हो. जाहीरातींच्या आणि ऑफर्सच्या खोट्या दुनियेला भुलून स्वतःची कष्टाची कमाई खर्च करण्यापेक्षा त्या वस्तूची आपल्या आयुष्यातील गरज आणि उपयोगिता आधी तपास.ह्या खोट्या चकचकाटाला तू भुललास तर त्यांचा फायदा होणार आणि खिसा तुझाच हलका होणार. म्हणून सावध राहा.काय भुललासी वरलिया रंगा,असं होऊ देऊ नकोस.खोटेपणापासून स्वतःचे रक्षण कर."

अनघा जगदळे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू