पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आज्जि ची शिक्षा

              लहानपणी केलेली मज्जा मना मधे नेहमी
साठी साठवली जाते . त्याची आठवण आली न कि
अजूनही गालात हसु येत ,  आणि मन लहानपणात
पुन्हा रमून जातं .
             आम्ही आई  काकू  आणि सर्व चुलत भाऊ बहिणी गर्मी च्या सुट्टीत इंदुर ला आजी आजोबान कड़े रहातं असु .
बाबा आणि काका मधून मधून  सुट्टी घेउन येत असायचे .
              शनिवार - रविवार बाबा आणि काका
आले . भाजी व सामान आणुन घरी ठेवलं‌. आता दोघे भाऊ त्यांच्या मित्रास भेटायला जाणार होते . जेवण झाल्या वर १वाज़ता ते दोघे निघाले . त्यांचे मित्र राम- बागेत रहात असे .
             आम्ही पोरांची मस्ती धमाल चालली होती
अचानक आम्हाला सुचलं कि आपण सिनेमा बघायला चलावं .आम्ही सगळे आज्जि कड़े आलो .
     " आ्ज्जि  अपण सिनेमा ला चलायचे का "?
         "नको बेटा आज नको, पुढ़े बघु हं "
        "आजी आम्हाला आज़च जायचे आहे प्लीज़ चल नाऽऽऽ " लहान बहिण आज्जिच्या गळ्यात पडली .
         तुम्ही मुली पण ना..असं म्हणत आज्जि तयार व्हायला उठली .आम्ही मुली पण तयार झालो . लगेच
रिक्षा करून रीगल टाॅकीज़ ला पोहोचलो .' बातों बातों में ' सिनेमा ला लांब रांग होती .पण मुलीन मधे आमचा चवथाच नंबर होता . आमचा नंबर येणार तेवढ्यात बाबा आणि काका आमच्या बाज़ूने येतांना
दिसले .
        " अरे आमच्या दोघांचे  तिकिट  पण घ्या "
माझी लहान बहिण रांगेत होती, दोघांना बघून आज्जि बोलली अरे तुम्ही दोघे तर  मित्रा कड़े गेले होते ना मग काय झाले  ??
        " अगं आई आम्ही रस्तेत प्लान बदलला "
       "प्लान बदलला कि  पहिलेच ठरलं होतं "???
मला बनवता का ?
        
            आज्जि ने दोघांना शिक्षा म्हणून सर्वांचे तिकिट काढ़ायला लावले त्या शिवाय घरी जाउन पण शिक्षा मिळाली होती .
            घरी गेल्यावर काका चहा करत होता .आई
व काकू ला काही समज़त नव्हतं. आम्ही पोरं खूप हसंत होतो। नंतर बाबा ने कप बश्या विसळल्या .आई व काकू नाही म्हणत होत्या तर आज्जि म्हणली करू द्या गं त्याना . आज्जि ने दोघांना शिक्षा केली होती .
     नंतर आई व काकू ला सर्व कथा सांगितली ,  मग आम्ही सर्व जण खूब हसलो अगदी पोट दुखस्तवर . बाबा आणि काका पणआम्हाला सामिल झाले .....
                              सुनिता डगांवकर 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू