पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सप्तपदी

सप्तपदी चे फेरे घेताना मन खुप भरकटत होत
का कोण जाणे सैरभैर सारख उडत होत..
सारे च मग्न होते आपल्या आपल्या विश्वात
मी मात्र गुरफटले होते स्वतःच्याच विचारात…
इतके वर्षांच स्वप्न आज पूर्ण होत होत..
पण जूनं माग सारुन, नवं जवळ करायला
माझं मन धजत नव्हत…
एक डोळा आई वर होता..
जी आपल्या हसण्यामागे माझ्या जाण्याच दुःख लपवत होती…
तर एक डोळा बाबांना शोधत होता…
जो हळूच रुमालाने डोळ्यांचे काठ टिपत होता….
भावा-बहीणींच ते दिलखूलास प्रेम मला मागे टाकायचं होत…
तुझ्यासोबत सप्तपदी सारखचं आता आयुष्यभर चालायचं होत…
नव्या आयुष्याची नवी उम्मेद मला साद घालत होती..
पण माहेर सोडताना का कोण जाणे माझी पावलं अडखळत होती…


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू