पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पाऊस येतो नी जातो

 

   पाऊस येतो नी जातो

 

 

पाऊस येतो नी जातो, भावनांच्या महासागराला साद देतो

तो नाहीच आला कधी तर, आठवणीने जीव कासावीस होतोआणि जर सारखाच येऊ लागला तर, नकोसा पाहुणा होतो

शहरात आला तर चिकचिक, दलदल आणि कधी तर "कशाला आलारे हा पाऊस आता?" अश्या खड्या बोलाने दुखावला जातो

आणि खेड्या पाड्यात आला तर, शेतकरयाच्या " आला रे माझा राजा" ह्या मायाळू शब्दांनी सुखावला जातो

शहरात तो इमारती भिजवतो, छपरे उडवतो, एकुण काय तर लोकांना रस्त्यावर आणतोखेड्या पाड्यात मात्र तोच पाऊस सारया विश्वाच्या अन्नदात्यांची तहान भागवतो नी काळ्याभोर धरणीमाईला हिरवीगार करतो

आता तुम्हीच सांगा तो दोन्हीकडे सारखाच येतोमग आपण त्याला असा दुजाभाव का देतो

शोधायला आपल्या प्रश्नाच उत्तर, मदतही तोच करतोआणि पुन्हा पुढच्या वर्षी त्याच्या येण्याची वाट पहायला लावतो

पाऊस येतो नी जातो, भावनांच्या महासागराला साद देतो

- विजया कुइगडे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू