पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

असत्य जास्त वेळ टिकत नाही

असत्य जास्त वेळ टिकत नाही....

प्रसंग तेव्हांचा आहे ज्या वेळेस मी नुकताच बैंकेत "जॉइन" झालो होतो.
मैनेजर दिसण्यात "हैंडसम" ,फारच रौबदार, काटक  तितकेच सख्त मिजाज,वेळेचे पाबंद, प्रामाणिक आणि शिस्तबद्ध होते. मनुष्याच्या चेहरा बघून त्याला ओळखण्यात त्यांची ख्याती होती.  बैंकेचे"डिफॉल्टर" त्यांच्यापासून चार हात दुरच असायचे.
एक आवडता "जॉब" मिळाल्यावर माझा सर्व उरलेला वेळ आणि पगार सैर सपाटा करण्यात जाऊ लागला,हे त्यांचा लक्षात आले.
त्यांनी एकदा विचारले की -
"बैंक सुटल्यावर काय करता?"
मी उत्तरलो की "विशेष काही नाही, शहरतला एक चक्कर असतो आणि गप्पा गोष्टी मित्रांसोबत."
मैनेजर -"टाइपिंग येते का?"
मी -"नाही"
"मग शिकत का नाही?" मैनेजर म्हणाले.
"प्रयत्न करेन" मी गोष्ट टाळण्याचा उद्देशानी बोललो.
"कधी पासून" त्यानी लगेच विचारले.
मी मनात विचार केला कि ह्या माणसाने तर पिच्छाच धरला. वैतागून बोललो की उद्या जाऊन विचार पूस करून येईन.
15-20 दिवस निघुन गेले, गोष्ट आली गेली झाली. बैंकेची नौकरी मिळाली त्या नंतर कुठल्याही प्रकारचा अभ्यास परीक्षा किंवा मानसिक त्रास करून घेण्यासाठी मन तयार नव्हते. एक दिवस परत मैनेजरने विचारले की "कर्पे तुमच्या टायपिंग क्लासचे काय झाले?" माला अचानक असल्या "एंक्वायरीची" अपेक्षा नव्हती. मी सुद्धा टाळून देण्याचा उद्देशाने उत्तर दिले की "अजुन क्लास मधे सीट रिकामी नाही.
1 तारखे पासून होईल."
पुढील दोन तीन महीने बरे गेले।माला ही असे वाटू लागले साहेब आता विसरले।
एक दिवस बैंकेतुन घरी जाण्याचा वेळी त्यांनी विचारले "1 तारखे पासून तुमची क्लास सुरु झाली असेल न"
मी खोटे च उत्तर दिले की "हो साहेब क्लास चालू आहे"
3-4 महिन्या नंतर एक दिवस साहेबांनी आदेश दिला की "ह्या पत्रा चा 1 प्लस 3 काढून द्या।आता तर तुम्हीं टायपिंग करण्यात "एक्सपर्ट" झाला असाल."
पेपर देऊन ते केबिन मधे जाऊन बसले.
मी पत्र घेवून टाइपराइटर समोर बसलो.
आता मी त्यांना कस सांगू की टाईप करणे तर सोडा मला तर कागद ही त्यात लावता येत नाही.
माझे सहकर्मी(collegues) माझ्या कड़े तिरकस नज़रेने ने बघू लागले. एका सीनियर मित्राने येवून कागद लावून माझी मदत केली. आता मी एक एक शब्द की -बोर्ड वर शोधून टाइप करू लागलो.
झाले असे की लिहायचे काय असायचे आणि टाईप भलतेच होऊ लागले. मला तर घाम सुटला ,भीती मुळे. सर्वांची खुसफुस चालू होती. मैनेजर आपल्या जागी शांत बसले होते कारण त्यांना आधी पासूनच खात्री होती की टाईप येण्याचा प्रसंगी मी त्यांच्याशी खोटे बोलत आहे.
थोड्या वेळाने ते येवून माझ्या मागे उभे राहिले.
"काय कर्पे टाईप झाले काय?"
मी काय उत्तर देऊ? चुपचाप घामाघुम झालेलो ,मान खाली करून त्यांचा समोर उभा राहिलो.
माझा पाठी वर हाथ फिरवत म्हणाले की
"तुमचे खोटे तर मी पहिल्याच दिवशी ओळखले होते."
मी "सॉरी" शिवाय काहीच बोलू शकलो नाही.
आता ते ह्या जगात नाही.
आज पण कम्युटर किंवा मोबाईल वर लिहित असताना मला मैनेजर कै.ओमप्रकाश अग्रवाल आठवतात आणि
मी मनातल्या मनात अजुन ही म्हणतो की
"टाइपिंग शिकलो असतो तर.......

 

©दीपक कर्पे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू