पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चांदणेही वेचिले




             चांदणेही वेचिले


चांदणेही वेचिले, काय उणे केले ?

शुक्रतारे आणिले, काय उणे केले ?

तिमिरातही काजव्यांनी, शोधले तुला मी

तुज देहशिल्पी कोरले, काय उणे केले ?

सोसल्या झळा, उन्हपावसाच्या सदा

गाळले मी अश्रू फुले, काय उणे केले ?

समर्पिला सरितासम, अवघा देहाकार मी

क्षण माझे ना उरले, काय उणे केले ?

रिझविले सप्तसूर, कोकिळाही मी जाहलो

गझलांनी मी छेडिले, काय उणे केले ?

पेटली चिता माझी जरी, सुगंधित तू व्हावे

अर्पिले मी श्वास फुले, काय उणे केले ?

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू