पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझ्या मना

 

माझी तफावत उडाली आहे  "ही" आणि "ती" मध्ये बघ . मी  अशीच आहे कारे?
किती दिवसांनी  जरा निवांत आले बघ मी  आज इथे अंगणातल्या  बागेत .
 मोगऱ्या च्या झाडावर लगडलेली ही  फुलं एक मंद , मोहक, धुंदावणारा सुगंध . पांढरी  फुलं अलवारपणे ओंजळीत भरतांना  बरोबर येतो तो  पावसाळ्याचा  मृद्गंध .अहाहा !! फुलं गोळा करताना एकेक आठवणींचे कप्पे उघडतायत  बघ .डोळे  अन मन भरून पावतय .
तेव्हड्यात ती पण डोकावली बघ ..
"छे! कसल्या स्वप्नांना मध्ये रंगले मी. साढे पांच वाजायला आलेत सासूबाईंचा आवाज येईल इतक्यात " सुगंधे ! चहा ठेवलास का अग माहीत आहे ना तुला ह्यांना घड्याळी च्या काट्यावर चहा लागतो ते."अरे! कुठे गेलीत ती माझी स्वप्न मोकळी झेप घेण्याची का मी खरंच हरवलेय आपल्याला या माणसांच्या समुद्रात.
पण  "ही "काही नाती अशीच असतात ना रे , फुलांसारखी ..... नाजूक, हळुवार.जगण्याला कारण देणारी. पावसात भिजवणारी, मग त्यांच्याशी तर जुळवून घ्यायला हवं ना .
खरं सांगू पूर्वी मला खूप वाटायचं कि मी "ही" आणि "ती" दोघींचा सांभाळ करीन पण आता असं वाटतंय मी आपल्या अंगावर एक लोखंडी शृखंलाच बांधून घेतलीये जणू
"हे बघ  ना आता ते पक्षी किती चिव-चिव ,किलबिल किलबिल करतायत, चोची तून शिट्या मरून-मारून बोलावतायत प्रियकर ला . मी बोलायचे बघ  पूर्वी ह्यांच्या बरोबर . कोकिळे ची तर नक्कल करत करत चिडवायचे आठवतंय?
अन आता हे बघ आलीच ती चिव-चिव करत ...आता हे असं का, ते काय झालं सांगू ...ऐ  आई! ऐकतेस ना .. आज किनई माझ्या ....नुसता एकेरी कल्लोळ घालणार बघ .
कधी कधी मला वाटतं , का इतकी धावपळ करतो आपण. वेड्यासारखे धावत सुटतो सगळीकडे निरुद्देश.
..... हे बाकी फार गोड आहे. आपलं असणं आणि नसणं दोन्ही तितकंच जाणवतं समोरच्याला, हे पाहून मन शांतावतं जरा तरी , नाही ??
"ही"-- तू समुद्र नीट पाहिलायस कधी ? किनारा, शंख शिंपले, वाळू, लाटांचा फेस.....सगळं सगळं सुखावणार तरीही परत परत समुद्रात जायची तृष्णा राहतेच. का माहितीये, कारण समुद्राचा तळ दिसत नाही आपल्याला आणि तो दिसणार नाही माहिती असतं तरीही पुन्हा पुन्हा ओढ लागून राहते. मग उमटतात त्या आपल्या पाऊल खुणा. सुखावतात त्या निरभ्र आकाशातील  लखलखत्या चांदण्या
"ती" -तसंच आहे तुझ्या बाबतीत, तुझ्या मनाचा किनारा सुद्धा अवचित गाठू देतोस तू. कशात स्वतःला इतकं बंदिस्त करून घेतलंयस देव जाणे. मग मी नुसती उभी असते किनाऱ्या वर. खरंय ना ?

 रे मना !...शेवटचं खळखळून कधी हसलोय, आठवत नाहीये. मला तर ती  शेवटची कधी मोकळेपणे रडली  कुठला   गिल्ट   ना बाळगता , ते सुद्धा आठवत नाहीये. इतकं हरवून बसलोय का रे आपण आपल्यालाच ?? खरं तर एक क्षण लागत नाही डोळ्यात पाणी यायला, पण पाणी पापण्यांच्या काठावरच राहतं आताशा, बाहेर पडत नाही , याला काय म्हणावं नक्की.
तशी" मी "ही आनंदात आहे आणि हो हो "ती" सुद्धा ,तात्पर्य, मला तुझं खूप काही ऐकायचं आणि तुला खूप काही सांगायचंय . जमेल ना  ते ..

©नयना(आरती )कानिटकर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू