पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रेमाची वाट

 प्रेमा ची वाट.

 

मालती आज आपल्या वाढदिवसाला आतापर्यंत आपण किती आणि कसे जीवन काढले हा विचार करत होती., वयाच्या या टप्प्यावर ,जवळ जवळ 80 वर्ष तर झाली , तिला विचार पडला की आज पर्यंत मला खरे प्रेम कोणाकडून आणि किती मिळाले आहे बरं? आणि मी, कुणावर खरे प्रेम केले, हे कोडे काही तिला सोडवता येत नव्हतं. विचारांची चक्रे स्वतःच्या लहान पणापासून ,ते स्वतःच्या नातवंडा पर्यंत पोहचली. ती याचे, शोध करु लागली पण या सर्व टप्प्यांमध्ये तिला कळले की हे तर सर्वे आपल्या जीवनातले कर्तव्यच होते मी तर फक्त आपल्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. यजमानाचे फार लवकर निधन झाल्यानंतर , सर्व कुटुंबाच्या गरजा अगदी व्यवस्थित सांभाळत आता तर रिटायर होऊन सुद्धा वीस वर्ष झाली. मुलं, सुना, नातवंड, हे सर्व माझ्या आवश्यक गरजा औषध वगैरे व्यवस्थित सांभाळत असतात पण प्रेमाने जवळ बसून कधी बोलत नाही, की बोलत नाही? त्यांच्याकडे या साठी वेळच नाही, सर्वजण आपल्या संसारात गर्क, कार्यप्रसंगी येणारे पाहुणे सुद्धा मला घरात पाहून फक्त आजी तुम्ही पण या बरं, एवढंच बोलून परत खोलीच्या बाहेर, या सर्व प्रसंगानुसार तिला स्वतःची मागची जीवनचर्या आठवत होती आपण सर्वांना किती माया लावली पण आता यांची सर्व जीवनशैलीच बदललेली! म्हणून आज कधी तरी कुठे वाचलेलं आठवलं की एक शब्द आहे, जे आपल्याला कधीच पूर्ण समाधान देत नाही ते म्हणजे "प्रेम ",आणि तोच एक शब्द आहे, जे आपणही कधी कोणालाच पूर्ण देत नाही, कारण की त्याला त्याचे समाधानच होत नाही,
आणि मालतीला स्वतःचेच कोडे सुटल्याने समाधान झाले...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू