पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कायापालट

"आई,मला शॉपिंगला जायचयं.नवरात्र येणार ना मग प्रत्येक दिवशी एका रंगाची थीम आहे मला कपडे,ज्वेलरी घ्यायची आहे"नेत्राने आईला फर्मान सुनावले."नेत्रा,अग ह्यावर्षी नऊ दिवसाच्या रंगासोबतच बाह्यरूप सजवतानां अंतर्मनातील मळभ पण दूर होऊन जाऊ देत.करडा रंग परिधान करून आपल्या विचारांच संतुलन राख.नारिंगी घातल्यावर आजूबाजूला उल्हास निर्माण कर.पांढरा घातल्यावर आत्मशांतीचा शोध घे.लाल रंग परिधान केल्यावर नवीन ऊर्जेची उधळण करत लोकांना मदत कर.पिवळा घातल्यावर प्रसन्नचित्त अंतःकरणाने दिवसाची सुरवात कर. सकारात्मकता वाढेल.हिरव्याने नव्या सृजनाची सुरवात कर.मोरपंखी घातल्यावर आपल्याकडे काय नाही ह्यापेक्षा काय आहे ह्याचा विचार कर.जांभळा आणि निळ्या रंगाने विचारांच्या शुद्धिकरणाने आनंदाची अनुभूती घे.नवरात्रीत बाह्यरूपाबरोबर स्वतःच्या व्यक्तीमत्वाचापण कायापालट होऊ दे"

नेत्रा हा कायापालट करायला उत्सुक होती.


अनघा जगदळे


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू