पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अशी फुलावी नाती

आशा जीवनी फुलावी नाती स्वप्नांशी जुळावी

जगण्याच्या चार क्षणा यावी अनोखी झळाळी

 

आशा वेडी आशा खुळी

आशा भोळी आशा जाळी

भरे आशेनेच परी गूढ अंधारपोकळी

 

कधी आशा ही हसरी

कधी घाव हा जिव्हारी

परी आशेची उभारी मना सावरी अवेळी

 

आशा होतसे माऊली

देई सत्यासी साऊली

आशा एकच पुरेशी उभ्या आयुष्या उजळी

 

©आसावरी केळकर-वाईकर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू