पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

परिवर्तनाची लाट

परिवर्तनाची लाट


समाजाच्या वर्णव्यवस्थेने

बंदिस्त होते जीवन

मानसाच्या जगण्याचे

होतेच हाल भयाण


स्पर्शानं विटाळत होती

देव अनं पाणी सुद्धा

पशुपेक्षाही हीन होती

वागणूक अनं जगन सुद्धा


क्रांतीच वादळ उठल

अनं समाज सारा जागला

प्रकाश तो प्रज्ञासूर्याचा

अंधार चिरतच फाकला


वाचाच आली बंदिस्त

पिंजऱ्यातील पोपटांना

संघर्षाच्या जाणीवेन

चैतन्य आल दीनांना


विचाराने तेज विचाराची

क्रांतीच घडत गेली

दशेच्या जीवनसागरात

परिवर्तनाची लाट आली


सागर शंभरकर

नागभिड ,चंद्रपूर

9673769917

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू