पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आयुष्याची चव

आयुष्याची चव

आठवणींना पहावं एकांताच्या बशीमध्ये ओतून
आयुष्याची चव कळते प्रत्येक घोटा घोटामधून.

दुःखाचा कडवट चहा सुखाची गोड गोड साखर थोडीशीच मिसळायची मायेची वेलची पावडर तिखट शब्दांचा आल्याचा तुकडा टाका चिरून
आयुष्याची चव कळते प्रत्येक घोटा घोटामधून.

वात्सल्याच्या मधुर दुधाची सोडा अलगद धार
संयमाने पचवायाचा कधी नकार कधी होकार
चटका बसला जिभेला जायचं लगेच विसरून
आयुष्याची चव कळते प्रत्येक घोटा घोटामधून.

रागाच्या ज्वाळेत त्याला छान उकळून घ्यायचा
कितीही उकळला तरी त्याला नाही ऊतू द्यायचा
आपुलकीच्या गाळण्याने घ्यायचा हळूच गाळून
आयुष्याची चव कळते प्रत्येक घोटा घोटामधून.

रागालोभाचा कडवट चोथ्याचा होईल तो कचरा
हसत खेळत त्या चोथ्याचा मनातच करा निचरा
दुःखद अशा आठवणींना फेकायचे वेचून वेचून
आयुष्याची चव कळते प्रत्येक घोटा घोटामधून.

अरविंद गणपुले.पुणे
(९६८९५६१२९२)

पुनरावलोकन

तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू