पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

खरे मित्र

          "खरे  मित्र "


खरे मित्र  आनंदी, हौशी,  

मैत्रीत ठेवतात  समानता , 


कृष्णा  सारखे मित्र लाभले 

यातच  वाटते खरी धन्यता . 

विद्या, आणि कलागुणांची अफाट 

आहे तुम्हात क्षमता 


खुप पुण्यवान  आम्ही मिळाली 

तुमची प्रिय मित्रता. 

भर भरून आहे तुमच्यात प्रेम,

माया,ममता. 


चिली पिली बच्चे कंपनीमधे

तुम्ही  छान रमता. 

एकत्र जेव्हा कार्यक्रमात असता,

मौज मजेने रंगत आणता. 


गप्पा टप्पा, मुक्त चर्चा करताना 

रात्रीचे ही जागवता. 

थोरा मोठयाचा सदैव आदर,

आणि काळजी करता. 


म्हणूनच की काय सगळ्यांकडून

  कायम आशीर्वाद मिळवीता. 

प्रत्येक माणसास माणूस म्हणून  

माणुसकीने पाहता. 


तुमच्या  सुखी संसाराच्या, भर भराटिला

साह्य करो लक्ष्मी देवता. 




कवी :   लव क्षीरसागर. 

विक्रोळी,  मुंबई. 

मो : 9867700094.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू