पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मैत्री

       दोन माणसे जेव्हा एकाच रस्त्याने आणि एकाच दिशेने जात असतात तेव्हा त्यांच्यात सहवासाची भावना निर्माण होते, त्यातच त्यांचा मैत्रीचा उगम होतो.
आपण दुसर्याशी मैत्री केल्यानंतर त्याला काहीतरी अटी घालाव्यात पण त्या अटी वाईट न करण्याच्या घालाव्यात. त्यातूनच आपल्याला एक सच्चा दोस्त मिळू शकतो. मैत्री हे एक असे रासायन आहे की, त्यात आपण कोणताही रंग मिसळला तरी त्याचा रंग बदलतो. आपण आपल्या मित्राला चांगल्या सवयी लावाव्यात. आपण कोणाशीही मैत्री करू शकतो, कारण मैत्रीला वय, मर्यादा नसतो.
जर का आपला मित्र वाईट वाटेवर असेल तर त्याला आपण चांगल्या वाटेवर आणले पाहिजे. जर त्याने नाही ऐकले तर त्याचा सोबतचे संबंध कमी करा. पण जर का चांगला / खरा मित्र असेल तर त्याचासोबतचे संबंध वाढवा. मैत्री करत असताना कधी भेदभाव करू नका, जात-पात विचारू नका, आणि कधी अटी घालू नका. आपण आपल्या मित्राचा / मैत्रीणीचा अभिष्ठचिंतनाचा दिवस कधी विसरु नका.
जर का आपला मित्र / मैत्रीण कोणतातरी संकटात असेल तर त्याला / तिला वाचवण्याचा प्रयत्न करावा, कोणत्याही मित्राला कमी लेखू नका. जिवणात आपण मैत्रीला DOWNLOAD करावे, कारण तेच कधी-कधी आपल्याला उपयोगी ठरतात, पण काही मित्र असूनही शत्रू असतात त्यांना मैत्रीतून EXIT करा.
मैत्री तर कोणालापण कोणाशीही होऊ शकते, पण बहुधा असे बघायला मिळते की दोन बुध्दिमान व्यक्तींमध्ये कधीच मैत्री घडवून येत नाही. जी माणसे पाहिजे असतात ती आपल्याला कधीच मिळत नाहीत, पण जी नको असतात तीच आपल्या आयुष्यात येतात. पण जर का आपण त्यांचे रुपांतर मैत्रीत केले तर तिही आपल्याला हवीहवीशी वाटतात. आपल्या आयुष्यात खूप मित्र भेटतात त्यातील काही जातात तर काही आपल्या सोबतच राहतात जसे की झाडांची मुळे जरी फांद्या तुटल्या, फळे सांडली तरीही मुळे त्यांच्यासोबतच असतात.
' काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात.
बांधलेले नाती जपावी लागतात.
काही नाती जपूनही पोकळ राहतात, तर काही मात्र आपोआप जपली जातात.
कदाचित तीच नाती खरी असतात, त्यालाच मैत्री म्हणतात.
म्हणूनच मनाच्या बंधाने जोडलेले मैत्रीचे नाते कधीही तोडू नका, आणि चांगल्या मित्रांची साथ कधीही सोडू नका. '
मैत्री म्हणजे नवं नातं, नातं असं असतं की ते जपण्यासाठी आपण जीवाचीही पर्वा करत नाही. अविस्मरणीय मैत्रीचे उदाहरण म्हणजे- श्रीकृष्णाला 1600 बायका होत्या पण त्याने आपल्या मित्राला सुदामाला कधीच विसरला नाही. मैत्री ही कधीच पैशाने विकत घेता येत नाही, आणि ती देता पण येत नाही.
34 वर्षांचा माणूस समुद्रकिनारी बसलेला असतो. त्याची मर्सिडीझ कार त्याचामागे पार्क असते. एका हातात रोलेक्सच घड्याळ असतं. दुसर्या हातात आयफोन असतो. अंगात अरमनीचा सूट असतो. पायात इटालियन बूट असतात. गाडीत स्विस बँकेचे चेकबुक असते; पण डोळ्यात अश्रू असतात. प्रतेकाला प्रश्न पडला असेल का? कारण त्याची नजर शेजारी बसलेल्या चार मित्रांवर पडते जे आपल्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करत असतात ..... एवढेच लक्षात की जेव्हा तुम्ही मित्रांला मिस करता ..... तेव्हा कुठलंच ऐश्वर्य तुमच्या अश्रूंना थांबवू शकत नाही.....
आपण आपल्या मैत्रीला नाव ठेवले पाहिजे पण ते काय?
' मैत्रीचं नाव काय ठेवू?
स्वप्न ठेवले तर अपूर्ण राहिल.
पान ठेवले तर माध्यान्ह साथ सोडले.
मन ठेवले तर कधीतरी तुटेल.
मग विचार केला की श्वास ठेवू.
म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील. '

'' एक कप चहा
दोन खारी
.........आपली मैत्री
लय भारी ''
प्रत्येकानेच अशी भक्कम मैत्री करावी जे की तुटली तर श्वासानेच तुटेल नाहीतर वज्राघातानेही तुटनार नाही.
अशा विश्वासनीय मैत्रीला माझा सलाम........


SANGराम SALGAR 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू