पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मुखवटा

तुडुंब भरलेलं प्रेक्षागार,गोबऱ्या गालांच्या चेहऱ्यावर पसरलेली उत्सुकता,आणि टाळ्यांच्या कडकडाटात धडपडतं होणारं माझ्यासारख्या तुंदिलतनूचं आगमन.क्षणार्धात एक हास्याची लकेर अवघ्या तंबूभर पसरते आणि माझ्या चेहऱ्यावर फुलतो आनंद.


हो,मीच तो सर्कशीतला अवघ्या अडीच तीनफुटाचा विदूषक.आपल्या नकलांनी आणि उपदव्यापांनी सगळ्यांना खळखळून हसवणारा.रंगीबेरंगी कपड्यांमधे आणि रंगवलेल्या चेहऱ्यामधे हास्य फुलवणारा.मुखवट्यामागे आपले अश्रू लपवून करामती करणारा.आठवतोय का तुम्हाला?विविध चित्तथरारक करामती,प्राण्यांचे खेळ ह्या सगळ्यांसोबतच  तुमची बच्चेकंपनी वाट बघायची ती माझीच.


आता तर ती सर्कसपण बंद होण्याच्या वाटेवर आहे आणि आमचा रोजगारही.आतापर्यंत हेच काम करणाऱ्या मला कसं जगाव हाच प्रश्न आहे.सगळ्यांच्या दुनियेत हास्य फुलवणाऱ्या माझं जग मात्र उदास आहे. 

ह्या मुखवट्याआडच्या जगात कुठे काही काम मिळेल का हो जगण्यासाठी?

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू