पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

राँग नंबर

राँग नंबर

अनन्या फेसबुकच्या पोस्ट चेक करत होती. तीला फ्रेंड रीक्वेस्टची नोटीफिकेशन आली म्हणुन ती  रीक्वेस्ट चेक करायला लागली. 150 च्या वर रीक्वेस्टस आल्या होत्या. अनन्याला कमाल वाटली. लोक अनोळखी लोकांना अस कस अप्रोच करतात? फेसबुक जाँइन केल्या पासुन तीने फक्त 2 ते 3 मैत्रीणींना रीक्वेस्ट पाठवली होती.

                ती रीक्वेस्ट लिस्ट चेक करत होती. शक्यतो म्युच्युअल फ्रेंडस असतील तर ती रीक्वेस्ट अँक्सेप्ट करायची. तशीच एक रीक्वेस्ट होती तीच्या जवळच्या मैत्रीणीच्या फ्रेंडलिस्ट मधील. अनन्याने त्याचे प्रोफाईल चेक केले. योग्य वाटले म्हणुन रीक्वेस्ट अँक्सेप्ट केली. पुढील दहा मिनिटात  मेसेंजर वर हाय असा मेसेज आला. अनन्या चाट पडली. मनात म्हणाली बुलेट ट्रेन पेक्षा स्पीड जास्त आहे याचा.  हा माणुस पुर्ण वेळ सोशल साईट वर राहुन फावल्या वेळात नोकरीधंदा करतो की काय? तीने आरामात रीप्लाय दीला. लगेच समोरुन चँटींग सुरु. काय करतेस? कुठे रहातेस? घरी कोण कोण आहे? ऊत्तर देताना विवाह  संस्थेचा फाँर्म भरल्याच फिलिंग येत होत. आपण एवढे प्रश्न विचारत आहोत पण ही काहीच चौकशी करत नाही हे देखील त्याच्या लक्षात येत नव्हते. चौकशीचा इतका भडीमार चालु होता की हळुहळु आपण विवाह संस्थेचा फाँर्म भरत नसुन CBI वाले आपले पर्सनल डीटेल्स विचारत आहेत अस वाटायला लागल. अनन्या इरीटेट झाली कारण ती कुणाच्या खासगी बाबीत नाक खुपसत नसे आणि समोरच्याने पण तसे करु नये अशी तीची मनोमन ईच्छा असे. तीने मी बिझी आहे बाय असा मेसेज टाकुन बोलण संपवल. थोड्या थोड्या वेळाने जेवलीस का? काय जेवलीस?  नाश्ता झाला का? तु वेळ कसा घालवतेस? तुझ्या हाँबीज काय? वगैरे प्रश्नांचा भडीमार चालु होता.  त्यादीवशी तीने दुर्लक्षच केल. रात्री झोपलीस का? असा मेसेज आला.  अनन्या रात्री 10.30 ला झोपत असे आणि  रात्री झोपताना मोबाईल स्विच आँफ करायची तीची सवय. त्यामुळे गुड नाईट मेसेज तीला सकाळी मिळाला.

             दुसर्या दीवशी परत मेसेजेस चालु. शेवटी तीने त्याच्याशी बोलायचे ठरवले. त्याच्या गुड माँर्निंग मेसेजला रीप्लाय केला. लगेच तो आँनलाईन आला. स्वता बद्दल सांगु लागला. काय करतो. कसल्या हाँबिज आहेत. त्याला जिमची आवड होती. न चुकता जिमला जातो अस म्हणाला. तो जिमला जातो हे त्याने न सांगता सुध्दा अनन्याला त्याचे फोटो बघुन कळल होत. खरच त्याची पर्सनँलिटी रुबाबदार होती. व्यायामाने कमावलेल बांधेसुद शरीर.  अनन्याने त्याच्या पर्सनँलिटीची तारीफ केली आणि विचारल की  तुम्ही स्टीराँईड्स घेता का? तो म्हणाला नाही नँचरल डाएट. अनन्या म्हणाली गुड. कीप इट अप.  अनन्याने त्याला आधीच सांगितल की मला  स्त्री म्हणुन ट्रीट न करता तुझा एक मित्र म्हणुन ट्रीट केलस तर आवडेल. मी सतत आँनलाईन नसते. मी सकाळचा गुड माँर्निंग मेसेज सोडला तर fb च्या कुठल्याही माणसाशी चँटींग करत नाही. त्यावर अरे वा मला फार आवडल हे तुझ वागण. यात त्याला आवडण्या सारख काय होत हे तीला समजल नाही.

त्यानंतर अनन्या जे काही बोलत होती ते सगळच त्याला पटत होत. ती मनात समजुन गेली चापलुसगिरी करतोय. कसही करुन तीला बोलत ठेवुन संवाद वाढवण्यासाठी सगळा खटाटोप.  त्यानंतर त्याने अनन्या कडे वाँटसअँप नंबर मागितला. अर्थात तीने नकार दीला.  मी इतर पुरुषांसारखा नाही. कसा वेगळा आहे हे सांगण्याचा खटाटोप. अनन्या मनात म्हणाली सगळे असेच म्हणतात पण सगळे एकाच माळेचे मणी असतात. तुझा विश्वास नसेल तर नको देऊ नंबर अस म्हणाला.  हळुहळु अनन्याच्या लक्षात आल की बायकांशी मैत्री करुन त्यांच्याशी फ्लर्ट करायचा  त्याला छंद होता. अनन्या  मनात म्हणाली इतर बायका फसत असतील तुझ्या रुपावर आणि गोड बोलण्यावर परंतु मी अनन्या आहे. जीच्या सारखी अन्य कोणी नाही ती अनन्या. जेंव्हा तो बायका कशा त्याच्यावर फिदा आहेत आणि त्याला लाईफ कस एंजाँय करायला आवडत हे सांगुन मनुष्यजन्म एकदाच मिळतो त्याचा पुरेपुर उपभोग घ्यायचा अस अनन्याला समजावुन सांगु लागला. अनन्याचा संयम संपला. ती म्हणाली प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असतात. ज्याला तुम्ही सुख म्हणता तो  माझ्या द्रुष्टीने व्यभिचार आहे. पशुच मानवात रुपांतर होऊन बरीच युग लोटली परंतु तुमची मानसिक वाढ झालेली दीसत नाही. प्राण्यांना आहार निद्रा भय मैथुन या चार गोष्टींचीच जाणीव असते. तुम्ही पण या चार गोष्टीं मध्ये अडकला आहात. उत्क्रांती होऊन प्राण्याचा मनुष्य झाला. त्याला सदसदविवेक बुध्दी लाभली. चांगल्या वाईट गोष्टीतील फरक कळु लागला. पण तुमच्या पर्यंत हे काही पोहचलच नाही. मनुष्याच्या रुपातील श्वापदाशी मैत्री करण्याची माझी बिलकुल ईच्छा नाही. स्त्री पुरुष यांच्या मध्ये देखील निर्मळ पवित्र नात असु शकत हे तुमच्या कानावरुन कधीच गेल नसेल. तुमच्यावर होत असतील बायका फिदा. पण साँरी यावेळी तुमचा राँग नंबर लागला. मी तुम्हाला ब्लाँक करत आहे.  गुड बाय.



© स्मिता पांचाळ

sai9999.sp@gmail.com


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू