पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

उद्या फुटलं पहाटं

उद्या फुटलं पहाटं

वर्तमान पत्रात हाथरसची दुर्घटना वाचून अनु खूप दुखावली गेली होती .
आपल्या मुलीला वाइट रीत्या गमवून
घरच्यानां किती त्रास होत असेल या कल्पनेनेच अनुला शहारे येत होते .

अक्का स्वयंपाका साठी आल्या
होत्या .जवळपास सत्तरी च्या अक्का
पण कामात अगदी दक्ष . अनुला बघून
त्यांने प्रेमाने विचारले ,
" काय झाले आमच्या ताईला आज ,चेहरा कां पडला आहे "
अनु चा राग फुटला .
"कां हो अक्का असे घड़ते हे राक्षस कधी तरी संपतिल का "?
अक्कांचे़ डोळे भिजले होते . त्यांनी
दीर्घ श्वास घेतला.
ताई किती तरी शतकान पासून हे असेच चालले आहे

आज़ तुम्हाला सांगते ताई .
माझे लग्न झाले तेव्हां मी १६ वर्षाची
होते . लग्न हून सासरी गेले . मी घाबरलेली
दिवसभर बसले होते .रात्रि मला बायकांनी तयार केले . मग कळले कि रात्रि मला तिथल्या राजा कड़े पाठवणार आहे . हीच या गावाची पध्दत आहे . पहिली रात्र नवर्या मुलीला राजा बरोबर घालवायची असते .
मी खूप रड़ले ,सर्वान पुढ़े हात जोडले पण माझे कुणीच ऐकले नाहीं .

अक्का डोकं धरून बसलेल्या होत्या . डोळ्या मधे अग्नि भरली होती . अनु ने त्यांच्या खांद्यावर हात ठेवले .

"अक्का ही चूक पद्धत बदलली ना , आता एक दिवस अश्या घटना पण नक्कीच बंद होतिल आपण अशी आशा ठेउ या ."

काही न बोलता दोघी अमोर - समोर हातात हात घेउन बसल्या होत्या . नज़रेत असीम दुःख होते . अक्कांचे़ कोरडे पडलेले नयन पुन्हा झर झर वहात होते ....

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू