पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चव

मीता : Hi. अगं मी आज तुझ्या पध्दतीने भरली वांगी केली. 


अंजु : Hi. अरे वाह!  मग काय म्हणाला नवरा? आवडली का त्याला? 


मीता :  हो आवडली,  म्हणजे म्हणाला की चांगली झालिये भाजी पण आईच्या हाताची चव नाही हे ही सांगायला विसरला नाहीच 


अंजु : ह्म्ममं. जाउ दे ग. सगळे नवरे सारखेच. काहीही करा आईचेच गोडवे गातात 


मीता : ह्म्मम..मूडच गेला माझा 


अंजु : Hey cheer up. संध्याकाळी काकु भेटल्या होत्या बाजारात. उद्या ऑफिसला येताना माझ्याकडे डबा देणारेत तुझ्यासाठी. तुला त्यांच्या हातचीच भेंडी मसाला आवडते ना म्हणून.


मीता : wow..आत्ताच पाणी सुटलयं बघ तोंडाला


अंजु : चल बाय. भेटू उद्या.


आईच्या हाताची चव म्हणजे स्वर्ग. फक्तं आई आपली कि नवऱ्याची ह्यावर त्या चवीचा गोडवा ठरतो. नाही का ? 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू