पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मोक्ष

 

मोक्ष 


आपल्या पायदळी 
तुडविले तू 
अडथळे घालणारे निखाऱ्या सम
असंख्य खडक,

रचवली एक-एक वीट जोडून
रंगवली इंद्रधनुषी रंगाने 
घरा करिता

उजळले रक्त सम्बन्ध 
सूर्य प्रकाश सारखे
तेजस्वी,

दिला आधार हळू हळू  विसर्ग 
होणाऱ्या वृद्धा ना ही 
मनाच्या अंतःकरणा पासून ,

 


तीचा  ही आधार 
होता ठाम तुझ्या बरोबर
चंद्रमा च्या शीतल छाये
सारखा

सोडून ही अपल्या जन्मदात्यांना
वावरली घरात आपले
पणाने

तीने ही केले संगोपन,  योजन
व्यवस्थापन, अर्थाजन वेळोवेळी
केल आतिथ्य, सेवा,
वरिष्ठांची

तू 

निमूट पणे सारली तिला बाजूला 

आपली पितृसत्ता गाजवायला

आणी
  
तिने  केला प्रयत्न स्त्रीवादाचा

झेंडा फडकवण्याचा

 

 पण एक सांगू 

घराला घरपण देणारे हात
हातात घेतले असते ना
दोघांने बरोबर

तर तुला

नसती करावी लागली  प्रार्थना 
देवा कडे 
तिला ही नसती जपावी 
लागली माळ

मोक्ष प्राप्ती  ची 

 

©नयना आरती कानिटकर 

२७/१०/2020

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू