पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रवास

प्रवास

जिंदगी एक सफर है सुहाना..
यहाँ कल क्या हो किसने जाना...?

सफर...यात्रा..भटकंती...प्रवास...
प्रवास हा कुठल्याही प्रकारचा असू शकतो, एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाणे, एका पतंगाचा अगदी उचांवर जाण्याचा प्रवास, एका पक्ष्याचा विपरीत परिस्थिती मध्ये आपले ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणे, थंड प्रदेशातून उष्ण प्रदेशात जाणे,अशे विविध प्रकारचे प्रवास आहेत. मनुष्य जन्माला आला तो आपल्या जीवनातील विविध टप्पे गाठता गाठता शेवटच्या टप्प्यात येवून पोहोचतो हा देखील एक प्रकारे प्रवासच आहे. मग आज आपण याच प्रवासाबद्दल बोलू या.
बाळ जन्माला आले आणि येथून त्याचा प्रवास सुरू झाला, अहाहा काय ते रम्य बालपण. निरागस निष्पाप,ना कशाची काळजी ना कशाची चिंता. काहीही झाले तर आईवडील आहेतच.हा प्रवास सर्वांना हवाहवासा वाटतो कारण तशीच म्हण आहे ना लहानपण देगा देवा. हा मजेशीर प्रवास आता येवून ठेपतो शालेय जीवनात. खरे तर इथूनच सुरु होते खडतर प्रवासाची सुरवात. चांगला शिकला, अभ्यासात हुशार निघाला की हा प्रवास मस्तच. एखादा जर या टप्प्यावर उडाणटप्पू निघाला तर हाच प्रवास कंटाळवाणा होतो. रागावणारे आईवडील त्याला शत्रू वाटू लागतात. संपूर्ण आयुष्याला सुरळीतपणे मार्गावर नेणारा हा टप्पा.ह्या मार्गावरून दिवसेंदिवस आपली प्रगती करून एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचण्यात त्याला बरयाच आडचणी निरनिराळ्या मनस्थितीतून जावे लागते एक शिखर गाठण्यासाठी त्याला धडपड करावी लागते. आठवते नं ते गाणे..


इक रास्ता है जिंदगी
जो थम गए तो कुछ नही....

आणि मग तो एका विशिष्ट हुद्द्यावर येवून पोहोचतो.
नंतर, मनासारखा जोडीदार लाभून हा प्रवास संसार रूपी स्टेशनावर येतो .इथून त्याला सर्व प्रकारच्या अडचणींवर मात देवून पुढील टप्पा गाठायचा असतो. इथल्या सर्व जवाबदाऱ्या पार पाडत पाडत तो आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचतो. हा प्रवास मात्र सर्वच बाबतीत कठीण. आरोग्य उत्तम, घरातील सर्व साभांळ करणारे उत्तम तर हा प्रवास एक प्रकारे सुखद होऊन जातो आणि मनुष्य आपल्या आयुष्यातील शेवटच्या स्टेशन वर निवांत ईश्वर चरणी लीन होतो. तर मग हा होता संपूर्ण आयुष्याचा प्रवास जो आपल्याला चौऱ्यांशी योनीतून करायचा आहे .

कुणा न माहीत सजा किती ते
कोठून आलो ते नच स्मरते
सुटकेलागी मन घाबरते,
जो आला तो रमला
जग हे बंदिशाला
जग हे बंदिशाला

कसा वाटला माझा प्रवास?


©उज्वला कर्पे, देवास

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू