पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सासूबाई

                            " सासूबाई "


अशी एक व्यक्ती महत्वाची प्रत्येक कुटुंबात  दिसते,
फारच कमी लोकांना तिचे मनापासून कॊतुक असते.


ओळखा पाहू बरं,
आयुष्यात तीची थोडी फार का होईना लुडबुड असते.


लुडबुड शब्द बोलताना मला फार  वाईट वाटते,
कारण तिच्या स्वभावात सततची धडपड असते.


प्रेम, माया, जिव्हाळा भरभरून पसरवते,
स्वतः मात्र लेकीच्या संसाराच्या काळजीने झुरझुर झुरते.


राग, चीड, कधी कधी दुःख तिच्या डोळ्यात दिसते,
कठीण प्रसंगी, मानाअपमानाचे अश्रू धीराने गिळते.


संयम, जिद्द, माणुसकी, आणि नात्यातला गोडवा कायम जपते,
घराचं घरपण टिकवन्या साठी दिनरात  झटते.


नातवाच्या प्रेमापोटी तीळ तीळ तुटते,
घासातला घास चिऊताई  सारखा त्यास भरवते.


शेवटी  प्रत्येकाच्या घरात,  मनात,  आणि  समाजात तिचे विशेष स्थान असते, 


ति म्हणजे दुसरी तिसरी नसून,  प्रत्येक नवऱ्या मुलाची,  आणि नवऱ्या मुलीची फक्त  सासूबाई असते ,
फक्त  सासूबाई असते...


कवी : लव गणपत क्षीरसागर

  विक्रोळी मुंबई. 

मो9867700094.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू