पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मैत्री

कदाचित विसरेल गुलाब सुगंध

ना  दरवळेल  पारिजात मंद

 ना तहान भागविल  जलकुंड

 सदैव राहील मैत्री अखंड 


 ऋतू बदलतील सावल्या ही  ढळतील

 आपले म्हणणारे कदाचित दूर जातील

 घालू एकमेका साद धुंद

 सदैव राहील मैत्री अखंड


कारणे   नसावी मैत्रीत काही कारणांनी फक्त होतेभांडण

 मैत्री नसतं तत्वज्ञान ती असते प्रेमाची साठवण

 हया  साठवणीत ना पडो खंड

सदैव राहील मैत्री अखंड


साम्य नसतील दोघात काहीएकमेकांना आठवू

 मैत्रीतही  अशी खात्री, न विसरता,एकमेका मनातसाठवू

क्षेम कुशल विचारायला   वेळ ना कुठले बंध

 सदैव राहील मैत्री अखंड 


न बोलता न सांगता तू काही 

साद तुझी मज ऐकू येते कानी 

समस्या तुझ्या ऐकता येते माझ्या डोळ्यात पाणी, 

 मनातील एक कप्पा तुझ्यासाठी कुंद

सदैव राहिल मैत्री अखंड


जसे  लोणचे मुरे खळात 

जसा रसगुल्ला फुगी पाकात

 मदहोश नशा जुन्या व्हिस्कीत

 अशी मुरेल  मैत्री उभ्या आयुष्यात

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू