पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रवास वर्णन

प्रवास वर्णन

माझा जन्म मध्यप्रदेशातल्या मागासलेल्या गावातला. तीन हजार वस्तीच आदिवासी गाव निसरपूर. वकिल साहेबांचा वाडा घरात शेती, गुरंढोर, अर्थात प्रवासाची सुरवात बैलगाड़ीन झालेली. नर्मदा जवळ म्हणून जोडीला नौकाविहार ही होताच. असो पण परदेश प्रवासाचे, सगळे नक्षत्रं पत्रिकेत ठाण मांडून बसलेले. पुढच्या शिक्षणाची सोय गावात नसल्याने इन्दौरला प्रस्थान म्हणजे एस.टी. शी गाठ. त्या वेळया एस.टी. प्रवास म्हणजे रात्रदिन आम्हा युद्धाचा प्रसंग होता, त्यावर एक स्वतंत्र कादंबरी होईल. शब्द मर्यादेला महत्व गरजेच.
लग्न झाल हे एल.आय.सी.त म्हणून काश्मिर ते कन्याकुमारी भारतदेश फिरून झालेला. लग्नाच्या रौप्यमहोत्सवाची भेट म्हणून मुलांनी माॅरिशसची, केसरी टूर्सची दोन तिकिट पाठवली. माॅरिशसचा वाॅलकेनो ज्वालामुखी, बोट फैक्ट्री, सातरंगाची वाळू आणि 108 फूटाची शंकराची प्रतिमा सगळ रितसर पाहून झालं. या प्रवासात सोबत आदेश बांदेकर (भाउजी) दिलिप प्रभावळकर आणि भारती आचरेकर ही होत्या.
माॅरिशसची दर्शनिय स्थळ चांगली आहे पण चांगला आहे तो समुद्र किनारा. हाॅटेल मधून थोडे वाळू तुडवून गेल की सुंदर, नितळ समुद्र, सिंगापुरी नाराळाच्या माडानं नरलेला, दूसरं आकर्षण आत्तापर्यंत पत्रातून भेटलेली मैत्रिण धनवंती पोखराज, प्रत्यक्ष भेटली. तिने माॅरिशस आकाशवाणी मधून माझ्या कविता प्रसारित केलेल्या. तिच्या भेटीन नुसती शब्दांनी झालेली भेट. गळाभेटीत बदलेली.
पुढे जावई, लेक, नातवंड दोहा, कतार ला गेली. 2003 पासून आजतागयत पंढरपूरच्या वारी सारखी आमची कतारवारी चालू आहे. छोटासा सुबक, शिस्तबद्ध देश. समुद्र आणि रखरखीत वाळूचा हा देश आपल्याला विविधरंगी फुलांनी आणि हिरवळीन किती नटवता येईल याचा जणू इथल्या अमीरन चंग बांधलेला. सगळे माॅल झू. म्यूझियम, किल्ला, सेंडॅयूज असं बरचं पाहून झालेल पण मन रमल ते भव्य दिव्य कतार नेशनल लायब्ररीत. तासंतास फिरून, पाहून ही समाधान होत नाही. तो पुस्तकांचा मेळावा सोडून बाहेर निघावसं वाटतं नाही अश्या लायब्ररीच्या हिन्दी विभागात माझ्या पुस्तकांना कस्तूरबा आणि अभिमन्यूला ही स्थान दिलय हे विशेष. सध्या चिरंजीव कतारला आहे म्हणून कतार वारीत खंड पडला नाही.
नातु केतन अलोणीनं ग्लिओन युनिव्हर्सिटी स्विटझरलैंड मधून ग्रेज्यूएशन केलं. त्याच्या गे्रज्यूएशन सेरेमनीला जायच भाग्यलाभलं अर्थात जावयाच्या आग्रही प्रयत्नामुळे स्विटझरलैंड प्रवास शक्य झाला. एरवी नुसताच फिरायचा शौक वीजा करता करावी लागणारी धावपळ नकोशी वाटते. गावाकडची वृत्ति कायम आहे या बाबतित.
स्विटझरलैंड आखिव, रेखीव, स्वच्छ सुंदर देश. प्रथम दर्शनी पाहणारा प्रेमात पडेल असा. वाटतं देवाला सुंदर लैंडस्केप काढायची हुणकी आली आणि चित्र पूर्ण झाल्यावर स्वतःच त्याच्या प्रेमात पडला आणि त्यानं सजीवता बहाल केली.
अप्रतिम सौंदर्यात नटलेल्या देशाला, तितकच सुंदर ठेवण्याच श्रेय अर्थात स्विटझरलैंडवासियांना द्यायलाच हवं. त्यांनी आधुनिक सोई करताना आपल्या देशाच्या नैसर्गिक सौदर्याला इजा होउ नाही याच लक्ष ठेवलय.
लेक जिनेवा स्विटझरलैंड व्यापून खळखळाट करत असते त्या स्वच्छपाण्यात मांश्रु पासून जिनेवा पर्यंत कुठे ही आपलं प्रतिबिम्ब बघतायेतं चार्ली चेप्लिनच म्यूझियम, बुलची युनिव्हर्सिटी, चाॅकलेट फैक्ट्री आणि झरमेट टाॅप ची बर्फाळलेली डोंगर. खरं तर आरव्व स्विटझरलैंड डोंगरानं व्यापलेलं पण बस, ट्रेन, रोपवेच्या आधुनिक सोई इतक्या व्यवस्थित की आमच्या मुलांना आम्हाला आमच्या व्हिलचेयर्स सकट फिरवण सोप झाल आणि नातवाला डिग्री घेउन उतरताना, भरून आलेला क्षण अनुभवता आला.
पुढे जावई बापूंनी आपल बस्तान दुबईला बसवलं म्हणून दुबई प्रवास घडला. प्रेमात पडाव असं दुबई. तोंडावळा आपल्या मुम्बई सारखा. माणसाला तुलना करायची वाईट खोड असते. त्याला कारण ही तसच होत लेक ‘अलअदिल’. दातारांच्या सुपर मार्केटला घेउन गेली तर तिथे गौरी गणपती, पूजेच सामान्य अगदी सतपुतळया वस्त्रा पासून तर आपल्या आयुर्वेदाच्या औषधा पर्यंत आता हे सगळं पाहून मराठी मन सुखावणरच. बरं मंदिरात गेलो तर परिसर बनारस, उज्जैनच्या मंदिराच्या जवळपास दुकानांनी गच्च भरलेल्या गल्लया पण स्वच्छ आणि निटनेटक्या.
वाळवंढात नंदनवन फूलवलय शेख जाहिदन कायदे कानून कडक आहेत आणि ते गरजेच आहे नाही तर अठरापगड लोकं सर्व विश्वातून आलेली दुबईच काय करतिल सांगता येत नाही.
दुबई माॅल, इब्नबातूना माॅल, माॅल आॅफ एमिरेट्स, बुर्ज खलिफा. थोड्या वेळ बुरखा घालावा लागला तरी हरकत नाही पण कलाकुसरीच सौंदर्य पाहण्या करता आबुधाबीची मशीद जरूर पाहावी.
सध्या एवढच लवकरच लंडनला नातं शलाकाच्या ग्रेज्युएशन सेरेमनीला जायच आहे, तेव्हा पुढच्या प्रवासवर्णात तो प्रवास शामिल होईलच.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू